Posts

Showing posts from March, 2020

सर्वांनी मिळून कोरोना आव्हानाचा यशस्वीपणे मुकाबला करू - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Image
            मुख्यमंत्री सहायता निधीला पालकमंत्र्यांकडून एक महिन्याचे वेतन   अमरावती, दि. 31 :  बाहेरून आलेल्या नागरिकांच्या तपासणी, क्वारंटाईन आदी प्रक्रियेसाठी आरोग्य विभाग, महसूल, महापालिका यांची पथके कार्यरत असून, आवश्यक ती सर्व दक्षता घेतली जात आहे. या कालावधीत नागरिकांनीही संयम ठेवून दक्षता पाळावी, असे आवाहन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले आहे. या काळात मुख्यमंत्री सहायता निधीला एक महिन्याचे वेतन देण्याचा निर्णय पालकमंत्र्यांसह विविध लोकप्रतिनिधींनी घेतला आहे. बाहेरून येणा-या प्रत्येक नागरिकाची माहिती मिळवून काटेकोर तपासणी व दक्षतेबाबत वेळोवेळी निर्देश देण्यात येत आहे. प्रशासनाकडून ठिकठिकाणी पथके सुसज्ज आहेत. या काळात नागरिकांनीही संयम व धैर्य ठेवावे. कुठल्याही अफवेला बळी पडू नये. प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी आज महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व विविध मंत्री महोदयांसोबत आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा केली. कोरोना विषाणूचे संकट गंभीर असून, राज्याला आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन विविध लोकप्रतिनिधींनी एक

कोविड-१९ च्या संशयित रुग्णांबाबत खाजगी रुग्णालयांनी घ्यावयाची दक्षता

Image
          मुंबई, दि. ३१ : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर खाजगी रुग्णालये, सुश्रुषा केंद्रांनी कशा प्रकारे कार्यरत रहावे याबाबत राज्य शासनाने एक नियमावली तयार केली आहे. यामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे. १.       अशा खाजगी रुग्णालयांमध्ये संशयित कोविड-१९ रुग्ण आल्यास त्यांनी, इंडियन कौन्सिल फॉर मेडीकल रिसर्च या संस्थेने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कोविड-१९ च्या उपचार करणाऱ्या शासकीय वा इतर रुग्णालयांमध्ये संबंधित संशयित रुग्णास तत्काळ दाखल करावे. २.      खाजगी रुग्णालये नजिकच्या कोविड-१९ रुग्णालयाशी संपर्क साधून संबंधित संशयित रुग्णासाठी बेड आणि रुग्णवाहिका उपलब्ध आहेत का, याची खात्री करुन घेतील. सार्वजनिक आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयामार्फत पुरविण्यात आलेल्या, १०८-रुग्णवाहिकेमधून किंवा कोविड-१९ रुग्णवाहिकेमधूनच संबंधित रुग्णाला पाठविण्यात यावे. दोन्ही संचालनालयामार्फत प्रत्येक कोविड-१९ रुग्णालयात, १०८-रुग्णवाहिका पुरेशा प्रमाणात उपलब्ध असतील याची खात्री करुन घेणे आवश्यक आहे. भारत सरकारने आखून दिलेल्या कार्यपद्धतीनुसार संशयित रुग्णाला पाठविण्यात

जीवनावश्यक वस्तूंचे दर (31 मार्च 2020)

Image
अमरावती, दि. 31 :    संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री होऊ नये, यासाठी अधिकृत दरसूची जाहीर करण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हा पुरवठा कार्यालयातर्फे वेळोवेळी दरसूची जाहीर करण्यात येत आहे. कुणीही अतिरिक्त व चढ्या भावाने जीवनावश्यक वस्तूंची विक्री करू नये.   कृषी उत्पन्न बाजार समिती, तसेच विविध व्यावसायिक संघटनांकडून अधिकृत माहिती प्राप्त करून अशी सूची वेळोवळी जाहीर करण्यात येणार आहे. अमरावती किरकोळ व्यापारी असोसिएशनने 31 मार्च 2020 रोजी   प्रमाणित केलेले किराणा दर पुढीलप्रमाणे :                                                     तांदूळ वाण                                        लुचाई-      30 रू. प्रतिकिलो                                       एचएमटी- 45 रू. प्रतिकिलो                                     काली मुँछ (जुना) - 55 रू. प्रतिकिलो                                        काली मुँछ (नवीन)- 45 रू. प्रतिकिलो                                    

उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 3 महिने विनामूल्य गॅस सिलेंडर

Image
एप्रिल ते जून पर्यंतच्या कालावधीत प्रत्यक्ष लाभ जिल्ह्यातील 1 लाख 31 हजार नागरिकांना मिळणार लाभ अमरावती, दि. 31 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार व राज्य शासनाव्दारे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सर्वत्र संचारबंदी लागू आहे. या काळात उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एप्रिल ते जून या कालावधीत विनामूल्य गॅस रिफील देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 1 लाख 31 हजार नागरिकांना लाभ मिळणार आहे. एप्रिल ते जून या कालावधीत गॅस सिलेंडर रिफील करण्यासाठी लागणारा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अग्रिम स्वरुपात जमा करण्यात येत आहे.   कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजनांसाठी केंद्र सरकारने विशेष वित्तीय पॅकेजची घोषणा केली आहे. देशातील प्रत्येक नागरिकाने प्रशासनाने दिलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांचे पालन करुन या संकटाच्या स्थितीत आपले योगदान दिले पाहिजे, असे आवाहन करण्यात आले आहे. संचारबंदीच्या काळात देशातील विविध तेल कंपन्यांनी घरोघर गॅस सिलेंडर पोहोचविण्यासाठी नियोजन केले आहे. कंपन्यांकडे गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा आहे. त्यानुसा

कलावंत दीपाली बाभुळकर यांचा उपक्रम

Image
                       बोलक्या बाहुल्यांच्या व्हिडीओद्वारे जनजागृती अमरावती, दि. 31 : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी दक्षतापालनाबाबत बोलक्या बाहुल्यांच्या चित्रफितीद्वारे जनजागृती उपक्रम येथील पपेट शो कलावंत दीपाली बाभुळकर यांनी हाती घेतला आहे. त्यामुळे दक्षतापालनाबाबत विविध टिप्स फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लहानग्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच मिळत आहेत. श्रीमती बाभुळकर यांनी यापूर्वी निवडणूक कालावधीत ‘चिंगी’ या बोलक्या बाहुलीद्वारे जनजागृती केली होती. आता ‘मीनी’ ही नवी बोलकी बाहुली त्यांनी सादर केली असून, तिच्या चित्रफितीद्वारे त्या जनजागृती करत आहेत. आपल्या मार्मिक शैलीतून हसत खेळत आरोग्य शिक्षण देणारी मीनी ही बाहुली आता लोकप्रिय होत आहे. फेसबुक लाईव्ह व इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून हा कार्यक्रम सादर केला जात आहे. कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी कुटुंबातील सर्वांनी योग्य दक्षता घेणे आवश्यक आहे. त्यामुळे लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांशी हसत खेळत संवाद साधण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून केला आहे, असे श्रीमती बाभुळकर म्हणाल्या. श्रीमती बाभुळकर या दुनिय

प्रवासी, तसेच बेघर नागरिकांसाठी निवास व्यवस्था

Image
अमरावती, दि. 30 : बेघर, भिक्षुक, हातमजुरी करून पोट भरणारा वर्ग, रूग्ण व त्यांचे नातेवाईक, तसेच ज्यांना निवासासाठी स्वत:चे घर नाही अशा व्यक्तींच्या निवास, भोजन आदी व्यवस्था स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने करण्यात आली  आहे. त्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केला. त्यानुसार श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे हरीना फाऊंडेशन व रोटरी क्लब अमरावती यांच्या सहकार्याने व्यवस्था करण्यात आली आहे.  तेथील संपर्क व्यक्ती : श्री. मनोज राठी (मोबाईल क्र. 9422830224) व श्री. सारंग राऊत (9823104555). त्याचप्रमाणे, ख्रिश्चन अँड मिशनरी अलायन्स, अंबापेठ, राजकमल चौकाजवळ, अमरावती येथे व्यवस्था करण्यात आली आहे. तेथील संपर्क व्यक्ती : टी. एस. लव्हाळे (मोबाईल क्र. 9545356263). निवा-याची व्यवस्था करताना सुरक्षिततेबाबत काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.                                      000 

प्रवासी नागरिक व विस्थापितांना सुविधेसाठी संनियंत्रण अधिका-यांची नियुक्ती

Image
अमरावती, दि. 30 : बेघर, विस्थापित कामगार, परराज्यातील अडकलेले कामगार यांच्यासाठी निवारागृह, पाणी, अन्नधान्य व भोजन व्यवस्था आणि वैद्यकीय देखभाल या सुविधा देण्यासाठी संनियंत्रण अधिका-यांची नेमणूक करण्यात आहे. त्याबाबत आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केला. ग्रामीण क्षेत्रासाठी संनियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना सहायक अधिकारी म्हणून सहायक जिल्हाधिकारी विकास मीना व उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रासाठी संनियंत्रण अधिकारी म्हणून महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना सहायक अधिकारी म्हणून सहायक जिल्हाधिकारी वर्षा मीना व मनपा उपायुक्त महेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बेघर, विस्थापित झालेले कामगार, परराज्यातील अडकलेले कामगार यांच्या निवारागृह, पाणी, अन्नधान्य व भोजनव्यवस्था व वैद्यकीय देखभाल या सुविधांबाबतची कार्यवाही करण्याबाबत जबाबदारी सोपविण्यात आली आहे. व्यवस्थेसाठी जि. प., समाजकल्याण, आदि

कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणा सुसज्ज - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Image
सुपर स्पेशालीटी रुग्णालयाच्या विलीगीकरण कक्षाची पालकमंत्र्याकडून पाहणी अमरावती, दि. 30 : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येत आहे. जिल्ह्यात सध्यातरी एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेला नाही. तथापि, सुपर स्पेशालिटी रुग्णालयासह विविध ठिकाणी व्हेंटीलेटरसह सुसज्ज कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिली. जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या परिसरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलच्या विलगीकरण कक्षाची पाहणी आज पालकमंत्र्यांनी केली. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. त्यानंतर पालकमंत्र्यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयाची पाहणी करुन तेथील सुविधांचा आढावा घेतला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्यासह इतर फॅकल्टी डॉक्टर्स, विशेष कार्य अधिकारी रणजित भोसले यावेळी उपस्थित होते. श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येत असून जिल्ह्याच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात 100 ब

जीवनावश्यक वस्तूंचे दर

Image
संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री होऊ नये, यासाठी अधिकृत दरसूची जाहीर करण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हा पुरवठा कार्यालयातर्फे वेळोवेळी दरसूची जाहीर करण्यात येत आहे. कुणीही अतिरिक्त व चढ्या भावाने जीवनावश्यक वस्तूंची विक्री करू नये.   कृषी उत्पन्न बाजार समिती, तसेच विविध व्यावसायिक संघटनांकडून अधिकृत माहिती प्राप्त करून अशी सूची वेळोवळी जाहीर करण्यात येणार आहे. अमरावती किरकोळ व्यापारी असोसिएशनने 30 मार्च 2020 रोजी  प्रमाणित केलेले किराणा दर पुढीलप्रमाणे :                                                     तांदूळ वाण                                         लुचाई-      30 रू. प्रतिकिलो                                        एचएमटी- 45 रू. प्रतिकिलो                                  काली मुँछ (जुना) - 55 रू. प्रतिकिलो                                   काली मुँछ (नवीन)- 45 रू. प्रतिकिलो                                                                        

घराबाहेर पडू नका, काळजी घ्या - जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचे आवाहन

Image
   अमरावती, दि. 30 : अमरावती जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गबाधित आतापर्यंत एकही रुग्ण आढळला नाही. मात्र, प्रत्येकाने दक्षता घेणे आवश्यक आहे. कुठलीही लक्षणे दिसली तर तपासणी करून घ्या. घराबाहेर पडू नका. आरोग्य यंत्रणेच्या सूचनेचे काटेकोर पालन करा. मी स्वत:ला होम क्वारंटाईन करून घेतले आहे. आपणही घराबाहेर पडू नका, असे कळकळीचे आवाहन जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी केले आहे. राज्यमंत्री श्री. कडू म्हणाले की, कुठलीही लक्षणे आढळल्यास तत्काळ तपासणी करून घ्यावी. मला सर्दी, ताप, खोकला झाल्यावर मी तत्काळ तपासणी करून घेतली. रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यात घाबरून जाण्यासारखे काहीही नाही. दक्षता म्हणून सर्वांनी आरोग्य यंत्रणेच्या सूचनांचे पालन करावे. मी स्वत:ला ‘होम क्वारंटाईन’ करून घेतले आहे. सर्वांनी स्वतःची व इतरांचीही काळजी घ्यावी. घराबाहेर पडू नये, असे आवाहन राज्यमंत्री महोदयांनी केले आहे. शासनाकडून कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. नागरिकांनीही स्वयंशिस्त पाळावी. सर्वांनी मिळून या संकटाचा यशस्वीपणे मुकाबला करूया, असे आवाहन त्यांनी केले.              

अफवा पसरविल्यास गुन्हा दाखल करू - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

Image
अमरावती, दि. 30 : कोरोना विषाणू संसर्गाबाबत सोशल मिडीयाच्या माध्यमातून किंवा इतरही प्रकारे   अफवा   पसरविल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिला आहे. जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकही रूग्ण नसतानाही तसे असल्याच्या बातम्या काही खोडसाळ व्यक्ती मुद्दामहून सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवत आहेत. चुकीची माहिती पसरवून नागरिकांमध्ये घबराट निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. अशा समाजकंटकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिका-यांनी दिला आहे. शासनाकडून वेळोवेळी वस्तुनिष्ठ व अधिकृत माहिती प्रसृत केली जात आहे. एखाद्या व्यक्तीची तपासणी झाल्यानंतर त्याचा अहवाल प्राप्त झाला नसतानाही तो रूग्ण असल्याचे दर्शवून चुकीची माहिती पसरविण्याचे प्रकार घडत आहेत. काही घटनांमध्ये विशिष्ट व्यक्तींची नावे खोडसाळपणे संशयित रूग्ण म्हणून पसरविण्यासारखे अपप्रकारही घडत आहेत. अशा   अफवांमुळे होणारी सामाजिक हानी लक्षात घेता   अफवा   पसरविणा-याविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.                                      000

‘हा फॉर्म खोटा

Image
‘हा फॉर्म खोटा’ - रेशनवरील धान्य खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फॉर्म अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून वितरित करण्यात आलेला नाही.नागरिकांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी सोशल मीडियावरून व्हायरल कुठलाही फॉर्म भरून देऊ नये असे आवाहन अन्न,नागरी पुरवठा विभागाचे आवाहन केले आहे.