प्रवासी नागरिकांसाठी तालुक्यांच्या ठिकाणीही व्यवस्था


          प्रवासी नागरिक व बेघर व्यक्तींच्या निवारा, भोजन आदी सुविधांसाठी तालुका स्तरावर निवारा केंद्रे सुरु करण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले होते. त्यानुसार तालुक्यांत ही व्यवस्था करण्यात आली आहे.
      अमरावती शहरात बडनेरा येथील निवारा केंद्र, तसेच हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे सुमारे 400 व्यक्तींची व्यवस्था होत आहे. भातकुली येथील शासकीय औद्योगिक तंत्रनिकेतन येथे 200 नागरिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. चांदूर रेल्वे येथे नगरपरिषदेच्या जिजामाता प्राथमिक शाळेत 24 व्यक्तींसाठी, धामणगाव रेल्वे येथे भिकराज गोयनका न. प. शाळेत 12 व्यक्तींसाठी, नांदगाव खंडेश्वर येथे जि. प. कन्या शाळेत 9 व्यक्तींची, तिवसा येथे मागासवर्गीय मुलांची शाळा येथे 24 व्यक्तींसाठी, मोर्शी येथे नगरपरिषद शाळा क्र. 1, 2 व 7 येथे 128 व्यक्तींसाठी, वरूड येथे न. प. मराठी शाळेत 75, शेंदुरजना घाट येथे न. प. शाळा क्र. 2 मध्ये 25, चांदूर बाजार येथे न. प. मराठी विद्यालय येथे 40, अचलपूर येथे विदर्भ मिल मराठी शाळेत 56, दर्यापूर येथे न. प. शाळा क्र . 10 व 11 येथे 105, अंजनगाव सुर्जी येथे 1,2 व 7 येथे 128, चिखलदरा येथे न. प. विश्रामगृह व न. प. शाळा येथे 30, धारणी येथे रंगभवनात 25 नागरिकांची व्यवस्था करण्यात येत आहे. याखेरीज आवश्यकता भासल्यास अतिरिक्त सुविधेची तयारी ठेवण्याचे निर्देश आहेत._
      तालुक्याचे तहसीलदार व नगरपरिषदांचे मुख्याधिकारी यांना ही जबाबदारी सोपविण्यात आली असून, गरजूंनी संबंधित कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

                        000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती