कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणा सुसज्ज - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर












सुपर स्पेशालीटी रुग्णालयाच्या विलीगीकरण कक्षाची पालकमंत्र्याकडून पाहणी

अमरावती, दि. 30 : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येत आहे. जिल्ह्यात सध्यातरी एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेला नाही. तथापि, सुपर स्पेशालिटी रुग्णालयासह विविध ठिकाणी व्हेंटीलेटरसह सुसज्ज कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिली.
जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या परिसरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलच्या विलगीकरण कक्षाची पाहणी आज पालकमंत्र्यांनी केली. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. त्यानंतर पालकमंत्र्यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयाची पाहणी करुन तेथील सुविधांचा आढावा घेतला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्यासह इतर फॅकल्टी डॉक्टर्स, विशेष कार्य अधिकारी रणजित भोसले यावेळी उपस्थित होते.
श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येत असून जिल्ह्याच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात 100 बेडचे सुसज्ज विलगीकरण कक्ष कार्यानिव्त करण्यात आले आहे. कोरोना विषाणू हा अतिसंसर्गजन्य विषाणू आहे. या विषाणूचा प्रादूर्भाव हा गर्दीतून तत्काळ होतो. त्यामुळे नागरिकांनी सोशल डिस्ट‍न्सिंग ठेवून सतर्कता बाळगावी. प्रशासनाने घालून दिलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन करावे. घराबाहेर पडू नये.
अमरावती जिल्ह्यात सध्यातरी एकही रुग्ण कोरोना पाझिटिव्ह आढळून आलेला नाही. या पंधरवाड्यात जास्तीत जास्त काळजी घेणे नितांत गरजेचे आहे. विषाणूचा प्रादुर्भाव हा 14 दिवसांपर्यंत असतो. त्यामुळे सर्वांनी लॉक डाऊनच्या कालावधीत प्रशासनाच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन करावे. आताचा टप्पा हा सर्वांनी काळजी घेणारा टप्पा आहे. या टप्प्यात आपण जर चुकीचे वागलो तर, इटली सारखी आपली अवस्था व्हायला वेळ लागणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
बाहेरच्या राज्यातील व जिल्ह्यातील नागरिकांकडून होणाऱ्या स्थलांतराच्या परिस्थितीवर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. ज्या तालुक्याच्या ठिकाणी कारागीर, मजूरांचे स्थलांतर आढळून येत आहे, त्याठिकाणी स्थानिक प्रशासनाकडून तहसीलदारांकडून स्थलांतरांची निवाऱ्याची भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती