Tuesday, March 24, 2020

जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कायमस्वरुपी सुरळीत राहील


स्वत:सह इतरांनाही सुरक्षित ठेवा
- जिल्हाधिकारी शैलेश नवाल

‘कोरोना’च्या संसर्ग प्रतिबंधासाठी लागू केलेल्या जिल्हा प्रवेशबंदी आणि संचारबंदीसारख्या निर्णयांची अंमलबजावणी काटेकोरपणे होत आहे. सद्य:स्थितीत भाजीपाला , फळे,
दूध, अन्नधान्य आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कायमस्वरुपी सुरळीत ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करु नये. स्वत:सह इतरांनाही सुरक्षित ठेवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी निश्चित वेळही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करू नये. एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी मोकळी मैदाने उपलब्ध करून देण्याचे निर्देश महापालिकेला देण्यात आले. त्यानुसार 16 मैदानांवर मर्यादित वेळेत खरेदी विक्रीस मान्यता देण्यात आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतील आवक सुरळीत ठेवण्यात येणार असून, भाजीपाला, फळ उत्पादक शेतकऱ्यांचा माल बाजारात येणार आहे. निश्चित करून दिलेल्या वेळेत नागरिकांना त्याची खरेदीही करता येणार आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रतिबंध करण्यासाठी सर्वांनी दक्षता घेऊन स्वत:सह इतरांनाही सुरक्षित ठेवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
या काळात कुठेही वस्तूंची अतिरिक्त दराने विक्री झाल्याचे आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...