Monday, March 23, 2020

जिल्ह्यात अद्याप एकही पॉझिटिव्ह रूग्ण नाही


    

             साथरोग निवारणासाठी दक्षता घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य

-         जिल्हा प्रशासनाचे आवाहन

अमरावती, दि. 23 कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी शासनाकडून आवश्यक ते सर्व उपाय होत आहे. जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकही पॉझिटिव्ह रूग्ण आढळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सर्वांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.  

  परदेशातून, तसेच मुंबई- पुण्याहून आलेल्या नागरिकांना यापूर्वीच होम क्वारंटाईनच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संपर्कासाठी वैद्यकीय पथके नेमण्यात आली आहेत. आता जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आता घराबाहेर पडू नये व गर्दी टाळावी. जनतेच्या हितासाठी शासनाला हे कठोर पाऊल उचलावे लागले आहे. मात्र, या काळात परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी सूचनांचे पालन करावे. आपल्यासह इतरांचीही काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.  

शासनाकडून वेळोवेळी अधिकृत माहिती प्रसारित करण्यात येत आहे. कुठलीही शंका असल्यास हेल्पलाईनला फोन करून माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.

हेल्पलाईनसाठी जिल्हाधिकारी कार्यालय टोल फ्री क्रमांक  1800 233 6396 व संवाद कक्षाचा (0721) 2661355 असा आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाचा दूरध्वनी क्रमांक  (0721) 2663337, आपत्ती नियंत्रण कक्षाचा (0721) 2662025, अमरावती महापालिकेचा  8408816166, तर जिल्हा परिषदेचा (0721) 2662591, जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाचा (0721) 2665041, तर पोलीस आयुक्तालय नियंत्रण कक्षाचा (0721) 2551000 असा आहे.

राज्य नियंत्रण कक्षाचा (020) 26127394, एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प कक्ष (020) 27290066 आणि टोल फ्री क्रमांक 104 हा आहे.

                   000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...