जीवनावश्यक वस्तू खरेदी-विक्री केंद्रावर सुरक्षिततेचे निर्देश दुकानांच्या याद्या मिळवा, त्यांना दक्षतेच्या सूचना द्या - जिल्हाधिका-यांचे निर्देश

 जीवनावश्यक वस्तूंची खरेदी विक्री करण्यासाठी  सकाळी 8 ते दुपारी 12 ही वेळ निश्चित करून देण्यात आली आहे. या काळात ग्राहकांची गर्दी टाळणे, सुरक्षित अंतर राखणे हे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व दुकानांचा तपशील मिळवून याद्या तयार करा. त्यांना दक्षतेबाबत सूचना द्या, असे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिले.

 जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन यंत्रणेचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. महापालिकेचे आयुक्त प्रशांत रोडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, महापालिका उपायुक्त नरेंद्र वानखडे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, दुकानांवर ग्राहकांची गर्दी होऊ नये, यासाठी विविध उपायांचा अवलंब व्हावा. दुकानदारांची यादी तयार करा. त्यांचे संपर्क क्रमांक घेऊन त्यांना सूचना द्या. ग्राहकांना उभे राहण्यासाठी पांढऱ्या चुन्याने किंवा रंगाने मार्किंग करण्यास व किमान दोन ग्राहकांमध्ये 3 फुटाचे अंतर ठेवण्यास सूचित करा. ग्राहकांना चिठ्ठी , टोकन देऊन नंतर माल घेण्यासाठी वेळ देणे, शक्यतो व्हाटस ॲपद्वारे ऑर्डर घेणे, शक्य तिथे होम डिलिव्हरीची व्यवस्था करणे आदी उपाय अमलात आणायला सूचित करावे. त्यासाठी डिलिव्हरी, सामानाची ने-आण आदी कामे करणा-या व्यक्तींना दुकानदाराने ओळखपत्र द्यावे जेणेकरून पोलिसांना संनियंत्रण करणे सोयीचे होईल. 

कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी दक्षता घेणे सर्वांची जबाबदारी आहे. त्यादृष्टीने कार्यवाही व्हावी, असे निर्देश त्यांनी दिले.

                                    ०००


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती