रस्त्यांवर थुंकणारांना 200 रूपये दंड


अमरावती, दि. 21 : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. सार्वजनिक स्वच्छता राखण्याच्या दृष्टीने रस्त्यावर थुंकणा-या व्यक्तींना 200 रूपये दंड केला जाणार आहे.

जिल्ह्यातील खासगी दुकानांसह पानटप-या बंद करण्याचे निर्देश यापूर्वीच जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत. आता गावोगाव या आदेशाचे पालन व्हावे व सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास आळा बसावा या हेतूने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी सर्व गटविकास अधिका-यांना याबाबत कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार ग्रामपंचायतींना हे दंडवसुलीचे अधिकार दिले आहेत. महाराष्ट्र जि. प. व पं. स. अधिनियमाच्या कलम 198 व 199 नुसार ग्रामसेवक हे ही दंडाची रक्कम वसूल करू शकतात.

गावातील सर्व पानटप-या बंद कराव्यात, तसेच रस्त्यावर थुंकण्यावर प्रतिबंध घालावा. आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर दंडवसुलीची कारवाई करावी, असे आदेशात म्हटले आहे.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती