Saturday, March 28, 2020

संसर्ग प्रतिबंध उपाययोजनांचा विभागीय आयुक्तांकडून आढावा

  

    कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजनांच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांनी  आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला.
    पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर, पोलीस अधिक्षक हरी बालाजी, उपायुक्त गजेंद्र बावणे आदी यावेळी उपस्थित होते.  जिल्ह्यातून इतरत्र स्थलांतर करीत असलेल्या लोकांना ते जेथे असतील तेथे थांबविण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी यावेळी दिले. स्थलांतर रोखण्यासाठी आवश्यक सार्वजनिक उद्घोषणा करून स्थलांतर करीत असलेल्या नागरिकांना थांबण्याबाबत सूचना देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
        यावेळी प्रवासी नागरिकांना निवास व भोजनाच्या व्यवस्थेबाबत माहिती द्यावी, त्यांना तत्काळ दाखल करून घ्यावे, अशासकीय संस्था करीत असलेल्या प्रयत्नांबाबत त्यांना अवगत करावे, असेही निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यातील निवारा केंद्रांचीही माहिती त्यांनी घेतली. गर्दी टाळण्यासाठी विविध उपाययोजनांबाबत यावेळी चर्चा झाली.  

                               

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...