Sunday, March 22, 2020

शनिवारी पाठवलेले चार थ्रोट स्वॅब देखील निगेटिव्ह



आतापर्यंतचे सर्व ४७ अहवाल निगेटिव्ह
घाबरू नका, दक्षता घ्या
       - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

       कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी परदेशातून आलेल्या प्रवाश्यांची तपासणी, होम क्वारंटाईन आदी उपाययोजना होत आहे. पथकांकडून प्रवाश्यांशी संपर्क व पाठपुरावा होत आहे. काल शनिवारी पाठवलेले ४ नागरिकांचे थ्रोट स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. 
      त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी  केले आहे. 
       काल ४ व व तत्पूर्वी ४३ थ्रोट स्वॅब असे ४७ नागरिकांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. ते निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, आज १० नागरिकांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.  त्याबाबत अहवाल प्रलंबित आहेत.
आजपावेतो परदेशातून व पुणे, मुंबई येथून परतलेल्या २१४ नागरिकांशी संपर्क झाला असून त्यांना होम क्वारंटाईन ची सूचना देण्यात आली आहे. त्यांच्याशी वैद्यकीय पथकाकडून नियमित संपर्क होत आहे. आवश्यक दक्षतेबाबत जनजागृतीही केली जात आहे.  
 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...