जीवनावश्यक वस्तूंचे दर
संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री होऊ नये, यासाठी अधिकृत दरसूची जाहीर करण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हा पुरवठा कार्यालयातर्फे वेळोवेळी दरसूची जाहीर करण्यात येत आहे.
कुणीही अतिरिक्त व चढ्या भावाने जीवनावश्यक वस्तूंची विक्री करू नये. कृषी उत्पन्न बाजार समिती, तसेच विविध व्यावसायिक संघटनांकडून अधिकृत माहिती प्राप्त करून अशी सूची वेळोवळी जाहीर करण्यात येणार आहे.
अमरावती किरकोळ व्यापारी असोसिएशनने 30 मार्च 2020 रोजी प्रमाणित केलेले किराणा दर पुढीलप्रमाणे :
लुचाई- 30 रू. प्रतिकिलो
एचएमटी- 45 रू. प्रतिकिलो
काली मुँछ (जुना) - 55 रू. प्रतिकिलो
काली मुँछ (नवीन)- 45 रू. प्रतिकिलो
जाडी साखर- 40 रू. प्रतिकिलो
सोयाबीन – 110 रू. प्रतिकिलो
शेंगदाणा तेल – 140 रू. प्रतिकिलो (पाकिट)
डाळी
(घाऊक दर पुढीलप्रमाणे : घाऊक व्यापारी असोसिएशनने जाहीर केलेल्या दरांनुसार, भोला जिरा तांदूळ 26 रू. किलो, रूपाली तांदूळ 33 रू. किलो, लोकवन गहू 24 ते 25 रू. किलो, शरबती गहू 25 ते 27 रू. किलो, साखर 35 ते 37 रू. किलो, तूरडाळ- पटका 88 ते 91 रू. किलो, तूर डाळ- सव्वा नंबर 83 ते 85 रू., चणा डाळ-57 ते 60, उडीद डाळ 85 रू. किलो, मूग डाळ 102 रू. किलो, सोयाबीन तेल 101 ते 104 रू. किलो, शेंगदाणा 137 ते 143 रू. किलो, मिरची पावडर 150 ते 155 रू. किलो, हळद 140 रू. किलो, मसाला 140 रू. किलो
त्याशिवाय शासकीय दूध संकलन केंद्राने दुधाचे घाऊक दर जाहीर केले. त्यात गाईच्या दुधाचा प्रतिलिटर दर 30 रूपये, म्हशीच्या दुधाचा दर 40 रूपये आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने जाहीर केलेल्या घाऊक भावानुसार, कांदे 18 रू. प्रतिकिलो, बटाटा 16 ते 20 रू. प्रतिकिलो, टमाटे 12 रू. प्रतिकिलो, लसूण 40 रू. प्रतिकिलो, मिरची 24 प्रतिकिलो, वांगी 10 रू. प्रतिकिलो आहेत. हे सर्व घाऊक दर आहेत.)
Comments
Post a Comment