र्निजंतूकीकरणासाठी आंघोळीच्या साबनचा सुध्दा वापर उपयुक्त


बनावट हॅन्ड सॅनीटायझर पासून सावधान
अन्न व औषध प्रशासनाकडून आवाहन
बनावट हॅन्ड सॅनीटायझरची विक्री आढळून आल्यास तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन
अमरावती, दि. 29 : कोव्हीड-19 नोव्हेल कोरोना विषाणू आजाराचा संसर्गापासून बचावासाठी,  प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्ह्यातील ग्राहकांकडून हात स्वच्छ करण्याचे सॅनीटॉयझरची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे.
            हॅन्ड सॅनीटायझर हे औषधी व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 अंतर्गत कलम 3 (aaa) अंतर्गत येत असून हॅन्ड सॅनीटायझरच्या उत्पादनासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयाकडून मंजूर परवान्यांची आवश्यकता आहे. औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 नुसार औषध व सौंदर्य प्रसाधने साठवणूक, औषध विक्री व वितरण व गुणवत्ता नियंत्रित केल्या जाते.
            ग्राहकांकडून हॅन्ड सॅनिटायझरची मागणी प्रचंड प्रमाणात वाढलेली असल्याने स्थानिक संस्था उदा. महिला बचत गट, गृह उद्योग तसेच व्यक्तीश: अन्न व औषध प्रशासन, अमरावती कार्यालयाकडून आवश्यक परवाने मंजूर न करता हॅन्ड सॅनीटायझरचे उत्पादन विना परवाना करीत असल्याचे विभागाला दिसून आले आहे. त्यामुळे हॅन्ड सॅनीटायझर च्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.
            तेव्हा नागरिकांना निवेदन करण्यात येते की, हॅन्ड सॅनीटायझर खरेदी करतांना हॅन्ड सॅनीटायझर वरील लेबलवर उत्पादकाचे नाव, उत्पादन दिनांक, मुदत बाह्य दिनांक, पत्ता व परवाना क्रमांक पडताळून खरेदी करावी. तसेच कोव्हिड-19, नोवेल करोना विषाणू आजार n-COV संसर्ग प्रतिबंधीत करण्यासाठी हॅन्ड सॅनीटायझरचा वापर आवश्यक नसून कोणतेही र्निजंतूक करणारे हॅन्डवॉश किंवा आंघोळीचे साबनाचा वापर करण्यात याव.
            बनावट हॅन्ड सॅनीटायझरची विक्री नागरिकांना आढळून आल्यास तत्काळ त्यांची तक्रार किंवा सूचना जिल्ह्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या सह आयुक्त (अमरावती विभाग) अन्न व औषध प्रशासन, जवादे कंपाऊंड एस टी डेपोजवळ येथे संपर्क साधावा तसेच 0721-2665892 या दुरध्वनी क्रमांक कळवावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त म. वि. गोतमारे यांनी केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती