Tuesday, March 31, 2020

सर्वांनी मिळून कोरोना आव्हानाचा यशस्वीपणे मुकाबला करू - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर



            मुख्यमंत्री सहायता निधीला पालकमंत्र्यांकडून एक महिन्याचे वेतन 

 अमरावती, दि. 31 :  बाहेरून आलेल्या नागरिकांच्या तपासणी, क्वारंटाईन आदी प्रक्रियेसाठी आरोग्य विभाग, महसूल, महापालिका यांची पथके कार्यरत असून, आवश्यक ती सर्व दक्षता घेतली जात आहे. या कालावधीत नागरिकांनीही संयम ठेवून दक्षता पाळावी, असे आवाहन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले आहे. या काळात मुख्यमंत्री सहायता निधीला एक महिन्याचे वेतन देण्याचा निर्णय पालकमंत्र्यांसह विविध लोकप्रतिनिधींनी घेतला आहे.

बाहेरून येणा-या प्रत्येक नागरिकाची माहिती मिळवून काटेकोर तपासणी व दक्षतेबाबत वेळोवेळी निर्देश देण्यात येत आहे. प्रशासनाकडून ठिकठिकाणी पथके सुसज्ज आहेत. या काळात नागरिकांनीही संयम व धैर्य ठेवावे. कुठल्याही अफवेला बळी पडू नये. प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी आज महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व विविध मंत्री महोदयांसोबत आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा केली. कोरोना विषाणूचे संकट गंभीर असून, राज्याला आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन विविध लोकप्रतिनिधींनी एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला दिले आहे. जिल्ह्यातही विविध क्षेत्रांतून मदतीचे हात पुढे येत आहेत. प्रवासी, स्थलांतरित कामगार, बेघर व्यक्तींना अन्न, वस्त्र, निवारा आणि वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी जिल्ह्यात निवारा केंद्रे सुरु झाली असून, येणारा खर्च आपत्ती प्रतिसाद निधीतून करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, प्रवासी नागरिकांच्या मदतीसाठी जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संस्था, नागरिक पुढे येत आहेत.

या काळात व्यावसायिक, उद्योजक, विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिकांनीही  मुख्य

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...