हवेत फवारणी करणार असल्याचा मेसेज खोटामनपा आयुक्तांच्या नावे बनावट संदेश विश्वास न ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन




सिटी कोतवालीत तक्रार दाखल

अमरावती, दि. २१ : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी रात्री हवेत औषधाची फवारणी करण्यात येणार असल्याचा बनावट संदेश सोशल मीडियाद्वारे प्रसारित करण्यात येत आहे हा मेसेज संपूर्णत: खोटा असून त्यावर विश्वास ठेवू नये. याबाबत पोलिसांकडे ही तक्रार दाखल करण्यात आली आहे असे आवाहन महापालिकेतर्फे  करण्यात आले आहे. 
_मनपा आयुक्तांचा संदेश, नमस्कार ! मी तुम्हाला विनंती करतो की, आज रात्री दहा वाजल्यानंतर सकाळी पाचपर्यंत तुम्ही घराबाहेर पडू नये. कोविड किल1 च्या मृत्यूसाठी हवेत औषधाची फवारणी होईल. आपल्या सर्व मित्रांना नातेवाईकांना आणि आपल्या कुटुंबियांना ही माहिती सामायिक करा. धन्यवाद !_ अशा प्रकारचा मेसेज व्हाट्सअप वर व्हायरल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर फिरणारा हा संदेश महापालिका आयुक्तांकडून टाकण्यात आलेला नाही.
असे संदेश टाकून काही समाजकंटक जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा व भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.  त्यामुळे महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाल काळे यांनी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

०००

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती