Saturday, March 21, 2020

_गैरहजर आरोग्य कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा_



*जिल्ह्यातील ४४ आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांना नोटीस*

*_चोवीस तासांत हजर होण्याचे आदेश_.*

अमरावती, दि. २२ : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणेवर महत्वपूर्ण जबाबदारी आहे. जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे. असे असतानाही अद्यापपर्यंत कामावर रूजू न झालेल्या ४४ आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांवर जिल्हा परिषदेने कारवाईचा बडगा उगारला आहे. 

या कर्मचाऱ्यांनी २४ तासांच्या आत आपल्या पदावर रुजू व्हावे, अन्यथा साथरोग अधिनियमातील तरतुदींचा भंग झाला असे मानून सेवा समाप्त करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी या सर्वांना नोटिशीद्वारे दिला आहे. 

*कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आपत्कालीन उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच महापालिका आयुक्तांना दिले आहेत. त्यासाठी आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.* 
त्यानुसार जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी साथरोग नियंत्रण कक्ष स्थापण्यात आले आहेत.  त्याचप्रमाणे शीघ्र प्रतिसाद पथकेही तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे संबंधित आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या पदस्थापना चे ठिकाणी उपस्थित असणे अनिवार्य आहे तथापि ती रुजू न झाल्याचे निदर्शनास आले यावरून ही नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे आपण आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग करून ग्रामीण जनतेला आरोग्य सेवेपासून वंचित ठेवत असल्याचे आपले स्पष्ट मत आहे व आपण २४ तासात रुजू न झाल्यास सेवा समाप्त करू, असे नोटिशीत नमूद आहे.
_तळेगाव ठाकूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राजक्ता लगडे, आरोग्य सहायिका पुष्पा आखरे, चांदुर रेल्वे तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयातील आरोग्य पर्यवेक्षक संतोष कुमरे, आष्टी प्राआ केंद्रातील आरोग्यसेविका मंगला पडोळे, अनिता राठोड,  भातकुली येथील अजय वानखडे, काटकुंभ येथील डी. सी. सुरवाडे, एन. सी. बाळे, खोलापूर येथील अश्रफ अली, येवदा कोकर्डा येथील आरोग्य सेवक विवेक उमक, अनिल  श्रीखंडे, आमला बैरागड च्या वंदना कुऱ्हाडे, चांदूर रेल्वे तालुका  कार्यालयातील आरोग्य विस्तार अधिकारी संतोष कुमरे, शिराळा येथील जी. एस. मनोहरे, प्रभा सोळंके, अंजनगाव बारी येथील संदीप मुंडे, बेनोडा शहीद येथील डब्ल्यू. जी. बरडे, टेब्रूसोंडा येथील सुरेश बेलूरकर, श्री. बहादूरकर, किशोर गोहाड, सलोना येथील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल सुर्वे, आरोग्य सहायिका सुनंदा नाथे-भांगे, साद्राबाडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश वाघमारे व डॉ. गीतांजली लखदिवे, पंकज आसरे, गोविंद माने, लता ओलंबे, हरीसालचे आर. एस. धई, बैरागडचे गजानन निमकर व मीरा गोस्वामी, बिजूधावडी येथील भरारी पथक (टेंभली) येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा बरवट, कळमखार येथील रुपेश उईके व शरयू खलाले, इंद्रायणी भागवत, ब्राह्मणवाडा थडी येथील सिद्धार्थ भोजने, काटकुंभ येथील वीरू पच्छेल, किरण पच्छेल, माऊली जहांगीर येथील आर. के. वाघमारे, हिराबंबई येथील अस्थायी वैद्यकीय अधिकारी डॉ. भावना गमे, हतरु येथील डॉ. छाया गाडेकर व माला देशमुख, तळवेल येथील डॉ. मिलींद पाठक, हरिसालचे डॉ. निनावे, तळेगाव ठाकूर येथील एस. बी. राऊत यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे._ 

        ०००

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...