जिल्ह्यात तालुकास्तरावर कोरोना नियंत्रण कक्ष कार्यान्वित


तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची नोडल ऑफीसर म्हणून नेमणूक
अमरावती, दि. 26 : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी तसेच तत्काळ प्रतिबंधात्मक उपचार करण्यासाठी जिल्ह्यातील चौदाही तालुक्यात कोरोना नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहे. या नियंत्रण कक्षात तालुका आरोग्य अधिकारी यांची नोडल ऑफीसर म्हणून नेमणूक करण्यात आली असून केंद्राच्या आरोग्य पर्यवेक्षक व आरोग्य सेवक यांनी नियमित उपस्थित राहण्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने दिले आहे.
          ग्रामीण भागात संशयीत कोरोना रुग्ण आढळून आल्यास किंवा तसे लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तींना तातडीने उपचार व्हावा, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्ह्यातील चौदाही तालुक्यात कोरोना नियंत्रण कक्ष कार्यान्वित केले आहे. या केंद्राच्या माध्यमातून विषाणूचा संक्रमण रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार आहेत. नागरिकांनी घाबरुन न जाता, कोवीड-19 आजाराचे लक्षणे आढळल्यास तत्काळ तालुका आरोग्य अधिकारी यांचेशी संपर्क साधावा. ग्रामीण भागातील नागरिकांच्या तपासणीसाठी व आवश्यक उपचार सुविधेसाठी नियंत्रण कक्षाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे नाव, भ्रमणध्वनी व दूरध्वनी क्रमांक जाहीर करण्यात येत आहे. संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहे-
            अमरावती तालुक्याच्या नियंत्रण कक्षाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद करंजीकर (9021443050), आरोग्य पर्यवेक्षक दिपक खंडाते, आरोग्य सेवक दिपक नवाथे (8600697268) नेमणूक करण्यात आली असून सदर केंद्राचा दूरध्वनी क्रमांक (0721-2661309) असा आहे. भातकुली तालुक्यातील केंद्रासाठी डॉ. प्रतिभा बोरखडे (9422007906), आरोग्य पर्यवेक्षक श्री. चव्हाण (98811460478),आरोग्य सेवक अरविंद भेडे(9665335984) कार्यालयाचा दूरध्वनी क्र. (0721-2660059) आदींची नेमणूक करण्यात आली आहे.
अंजनगाव सूर्जीसाठी डॉ. सुधीर डोंगरे (7744022135), श्रीमती आर. एस. खोडे (7887426397), टी. ओ. कोरडे (9372695284), दूरध्वनी क्र. (07224-240095), दर्यापूरसाठी डॉ. राजेंद्र राहाटे (9423424586), श्रीमती मंदा मोहोड (9096818648), विलास देशमुख (9421823820), दूरवध्नी (07224-234070), वरुडसाठी डॉ. अमोल देशमुख (7798768282), खुशाल पिल्लारे (9421824038), नरेंद्र ददगाडे (8275217241) कार्यालय मो.क्र. (8698092990), मोर्शीकरीता डॉ. हेमंत महाजन (9860671691), व्ही. पी. पारोदे (9284897195), दिलीप निंभोरकर (9421826650), केंद्र दूरध्वनी क्र. 07228-223093, धामणगाव रेल्वे तालुक्यासाठी डॉ. हर्षल क्षीरसागर (9372251124), आय एच राठोड (9421828877), श्री. डकरे (9604239663), केंद्र दू. क्र. 07222-238990, चांदूर रेल्वे तालुक्यासाठी डॉ. महेश जयस्वाल (9422231525), एस जी कुभंरे (9923061962), डि एम अडगोकर (9421824582), केंद दू. क्र. 07222-255003,
नांदगाव खंडेश्वर करीता डॉ. इंगळे (9637383970), शरद अंबाडकर (9545527570), आर डी पवार (9527008357), केंद्र. दू. क्र. 0721-222007, अचलपूरसाठी डॉ. किरण शिंदे (8600374809), अरविंद पारधी (9422359080), विवेक पांडे (9890398211), केंद्र दू. क्र. 07223-227026, तिवसासाठी डॉ. ज्योत्सा पोटपीटे (9421820468), शरद घड्याची (8275886005), राजेश विधाते (9890099723), केंद्र दू. क्र. 07225-222123, चांदूरबाजारसाठी डॉ. ज्योत्सा भगत (9421526855), व्ही. अवसरमोल (8805161178), संजय चुडे (7745077145) दू.क्र.(07227-243448), धारणीसाठी डॉ. शशिकांत पवार (9421753141), पी. व्ही. सपकाळ (8329877101), एम व्ही भगत (9881369714), का.(मो क्र. 9765266099), चिखलदरासाठी डॉ. सतिश प्रधान (9960334474), विजय गंगासागर (9423427663), एस सी गायगोले (9763428191), का. दू. क्र. 07220-230593
000000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती