Monday, March 30, 2020

घराबाहेर पडू नका, काळजी घ्या - जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचे आवाहन

  


अमरावती, दि. 30 : अमरावती जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गबाधित आतापर्यंत एकही रुग्ण आढळला नाही. मात्र, प्रत्येकाने दक्षता घेणे आवश्यक आहे. कुठलीही लक्षणे दिसली तर तपासणी करून घ्या. घराबाहेर पडू नका. आरोग्य यंत्रणेच्या सूचनेचे काटेकोर पालन करा. मी स्वत:ला होम क्वारंटाईन करून घेतले आहे. आपणही घराबाहेर पडू नका, असे कळकळीचे आवाहन जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी केले आहे.
राज्यमंत्री श्री. कडू म्हणाले की, कुठलीही लक्षणे आढळल्यास तत्काळ तपासणी करून घ्यावी. मला सर्दी, ताप, खोकला झाल्यावर मी तत्काळ तपासणी करून घेतली. रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यात घाबरून जाण्यासारखे काहीही नाही. दक्षता म्हणून सर्वांनी आरोग्य यंत्रणेच्या सूचनांचे पालन करावे. मी स्वत:ला ‘होम क्वारंटाईन’ करून घेतले आहे. सर्वांनी स्वतःची व इतरांचीही काळजी घ्यावी. घराबाहेर पडू नये, असे आवाहन राज्यमंत्री महोदयांनी केले आहे.
शासनाकडून कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. नागरिकांनीही स्वयंशिस्त पाळावी. सर्वांनी मिळून या संकटाचा यशस्वीपणे मुकाबला करूया, असे आवाहन त्यांनी केले.
                                          000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...