Posts

Showing posts from May, 2017
Image
खनिज विकास प्रतिष्ठान निधीतून शिक्षण,स्वच्छतेच्या कामांना प्राधान्य द्यावे.                                                  पालकमंत्री प्रविण पोटे –पाटील यांचे निर्देश               अमरावती दि. 24 : जिल्हयातील खनिज विकास प्रतिष्ठानमार्फत खनिजबाधित क्षेत्रातील  विकासकामे करताना  पायाभुत सुविधेपेक्षा सामाजिक क्षेत्रातील  शिक्षण,पिण्याचे पाणी  व स्वच्छता या   कामांना  प्राधान्य देण्याचे निर्देश पालकमंत्री प्रविण पोटे पाटील यांनी आज दिले.                 जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा खनिज प्रतिष्ठान ट्रस्ट कार्यकारी परिषदेच्या  बैठकीत ते बोलत होते.यावेळी आमदार रमेश बुंदिले,जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ.शिरीष नाईक व खनिज कार्यकारी परिषदेचे  सर्व सदस्य उपस्थित होते.             दर्जेदार शिक्षणानेच  तळागाळातील लोकांचा विकास करता येईल .या साठी शाळेच्या इमारतींचे बांधकाम,स्वच्छतागृहे, पिण्याचे शुध्द पाणी ,अतिरिक्त वर्गखोल्यांचे बांधकाम आदी सुविधांचे प्रधानमंत्री खनिज क्षेत्र योजनेतून प्राधान्याने काम व्हावे.शाळाच्या बांधकामासंबंधीचे प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांकडुन मागविण्यात यावे
Image
मुसळखेडा येथे ग्राऊंडवॉटर रिचार्ज शाफ्टचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन जलसंधारण व वृक्षारोपणातून दुष्काळावर मात करु -            पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील अमरावती, दि. 19 : भूजलपातळीत सुधारणा करण्याच्या हेतूने शासनाने मोठ्या प्रमाणावर जलसंधारण व वृक्षारोपणाची कामे हाती घेतली आहेत. शासन, प्रशासन, विविध संस्था- संघटना यांचा समन्वय व लोकसहभाग याद्वारे जिल्ह्यात ही कामे पूर्ण करुन दुष्काळावर मात केली जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी आज केले.           भूजल सर्वेक्षण यंत्रणेतर्फे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत मुसळखेडा येथील भूजल रिचार्ज शाफ्टचे उद्घाटन करताना श्री. पोटे- पाटील बोलत होते. आमदार अनिल बोंडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी- कर्मचारी व विविध क्षेत्रांतील मान्यवर यावेळी उपस्थित होते. रिचार्ज शाफ्ट ही योजना भूजल पुनर्भरणासाठी उपयुक्त असल्याने ती मोठ्या प्रमाणात राबविणे आवश्यक आहे, असे सांगून श्री. पोटे-पाटील म्हणाले की, या उपाययोजनेद्वारे पहिल्या पावसाकत भूजल पुनर्भरण सुरु होते व परिसरातील पाणी साठ्यात वाढ होते. वरुडसारख्या डार्क झोनमधील
Image
पालकमंत्र्यांकडून वरुड तूर खरेदी केंद्राची पाहणी             अमरावती, दि. 19 :  जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी आज वरुड येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जाऊन तूर खरेदीची माहिती घेतली. आमदार अनिल बोंडे यांच्यासह विविध विभागांचे  अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.                                यावेळी पालकमंत्र्यांनी खरेदी केंद्राला भेट देऊन माहिती घेतली. तुरीची  आवक,  केंद्रावरील उपलब्ध सुविधा याबाबत त्यांनी तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. व  रजिस्टरही तपासले. तूर विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना सहकार्य करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. 0000000
Image
 सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा पालकमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पत्रकारांनी केले श्रमदान         दुष्काळमुक्ती हेच खरे उद्दिष्ट – पालकमंत्री श्री. पोटे-पाटील   अमरावती, दि. 19    : पानी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित वॉटर कप स्पर्धेत सहभागी वरुड तालुक्यातील अमडापूर व मुसळखेडा या गावांमध्ये श्रमदानासाठी पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी केलेल्या आवाहनाला पत्रकार बांधवांनी मोठा प्रतिसाद दिला. यावेळी स्वत: पालकमंत्री व अनेक पत्रकार बांधवांनी श्रमदान करुन गावक-यांचा उत्साह वाढवला.    दुष्काळावर मात करण्यासाठी पानी फाऊंडेशन व शासनाच्या वतीने आयोजित वॉटर कप स्पर्धेत सहभागी विविध गावांत लोकसहभागातून जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. पालकमंत्री श्री. पोटे- पाटील हे पत्रकार बांधवांसह सकाळीच मुसळखेडा येथे दाखल झाले. आमदार अनिल बोंडे, अमरावती जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह त्रिदीप वानखडे, विजय ओडे, संजय शेंडे, शशांक चवरे, राजेश सोनोने, संजय बनारसे, सुरेंद्र चापोरकर, प्रशांत कांबळे, अमोल खोडे, अंकुश गुडदे, मीनाक्षी कोल्हे, प्रवीण मनोहर,
Image
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक                 अमरावती दि.9 - गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना ही योजना राबविण्यासाठी जलसंपदा,प्रांतअधिकारी,तहसीलदा र,कृषी या यंत्रणाची बैठक आज नियोजन भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण कुळकर्णी,कार्यकारी अभिंयता जलसंधारण तायडे,प्रभारी जिल्हा कृषी अधिक्षक खरचान,उपवनसंरक्षक हेमंतकुमार मीना ,रोहयो उपजिल्हाधिकारी रमेश  काळे उप‍स्थित हेाते.              जलयुक्त शिवार या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमासोबतच जिल्हयात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना राबवावी. प्रांत अधिकाऱ्यांनी  या कार्यक्रमाचे नियोजन करावे .गावे हाती  घ्यावी तसेच ग्रामपंचायतीना सहभागी करावे.या कामासाठी फक्त एक महीना हातात आहे. 31 मे पर्यत तुर खरेदी,जलयुकत शिवार या कामासोबतच गाळमुक्त धरण  व गाळयुक्ता शिवार योजनेचे काम प्राधान्याने करावे अश्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यात. 6 मे च्या शासननिर्णयाचा अभ्यास सर्व अमंलबजावणी करणाऱ्या यंत्रणानी करावा असे ही त्यांनी सांगीतले. गाळमुक्त धरण