Posts

Showing posts from July, 2018
Image
व्याघ्रदिन दिनानिमित्त प्रतिकृती व सौंदर्यीकरण पालकमंत्र्यांच्या हस्ते अमरावती रेल्वेस्थानकावर लोकार्पण अमरावती, दि. 29 : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातर्फे व्याघ्र दिनानिमित्त व्याघ्र संवर्धनाबाबत जनजागृतीसाठी वन्यजीवनाचे दर्शन घडविणा-या कलाकृतींचे लोकार्पण अमरावती रेल्वेस्थानकावर  पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या हस्ते आज झाले. खासदार आनंदराव अडसूळ, मुख्य वन्यजीव संरक्षक तथा प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी यांच्यासह वनविभागाचे तसेच रेल्वेचे अनेक अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. मॉडेल रेल्वे स्थानक या अमरावती स्थानकाच्या लौकिकात या सौंदर्यीकरणाने भर पडली आहे.  रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागात विकसित केलेल्या उद्यानातील हिरवळीवर वाघाची प्रतिकृती बसविण्यात आली असून, आतील भागात प्लॅटफॉर्मवर आणि भुयारी मार्गातील भिंतीवर वन्यजीवनाचे, विशेषत: व्याघ्र संरक्षणाचे महत्व पटविणारी चित्रे काढण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे, प्लॅटफॉर्मवरील खांबांवरही वाघाच्या प्रजातीनुसार पाठीवरील पट्टे, ठिपके आदींची चित्रे काढण्यात आली आहेत. या कलाकृतींतून व्याघ्र दर्शन घडवून त्याद्वारे जनजागृती करण्य

इर्विन रुग्णालयाचा वाढदिवस उत्साहात साजरा उत्कृष्ट आरोग्य सेवेसाठी राज्य शासन कटिबद्ध - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील

Image
अमरावती, दि. 28 : मेळघटातील रुग्णांपर्यंत तत्काळ पोहचून त्यांना सेवा देणाऱ्या मोटरबाईक रुग्णवाहिका आज कार्यरत होत आहेत. मेळघाटसह सर्वदूर उत्कृष्ट आरोग्य सेवा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे केले. अमरावतीच्या इतिहासात गेली 90 वर्षे अविरत सेवा देणाऱ्या इर्विन रुग्णालयाचा वाढदिवस पालकमंत्री श्री. पोटे पाटील यांच्याहस्ते केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. मेळघाटासाठी 5 मोटरबाईक ॲम्बुलंसचे लोकार्पणही पालकमंत्र्यांच्याहस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. जि.प. आरोग्य सभापती बळवंतराव वानखडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. पोटे पाटील म्हणाले की, 90 वर्षांचा दीर्घकाळ इर्विन रुग्णालयातून सेवा देणाऱ्या डॉक्टर, परिचर, परिचारिका व कर्मचाऱ्यांचे योगदान जिल्ह्याच्या इतिहासात महत्वपूर्ण आहे. आरोग्य सेवेचे व्रत अंगीकारल्यामुळेच या व्यक्तींकडून सेवा घडत असते. आरोग्य सेवेतील व्यक्तींनाही कौटुंबिक जीवन,

‘मदर डेअरी’कडून माजी सैनिकांसाठी शहरात दुधविक्री केंद्रासाठी सहकार्य पूरक व्यवसायवृद्धीसाठी शासन प्रयत्नशील - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील

Image
             अमरावती, दि. 27 : विदर्भ-  मराठवाड्यासारख्या अर्वषणग्रस्त भागात दुग्धोत्पादन वाढून दुग्धजन्य पदार्थांचा फायदेशीर व्यवसाय दूध उत्पादक व शेतक-यांना करता यावा, यासाठी राज्य शासनाने अनेकविध योजना अंमलात आणल्या आहेत, असे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी सांगितले.           मदर डेअरी व नॅशलन डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या संयुक्त विद्यमाने येथील तखतमल शाळेजवळ मिल्क बुथ सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री श्री. पोटे पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.  बोर्डाकडून हे केंद्र माजी सैनिकाला प्रदान करण्यात आले आहे. दुग्धोत्पादनासारखा पूरक व्यवसाय शेतक-यांसाठी संजीवनी ठरतो. हे लक्षात घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांतून राज्याला पूरक व्यवसायासाठी राज्याला निधी व अनेक योजनांना चालना मिळाली आहे, असे श्री. पोटे पाटील यांनी सांगितले. माजी सैनिकांसाठी 28 बुथ        मदर डेअरी व बोर्डाकडून माजी सैनिकांना अमरावती शहरात दुग्ध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री करण्यासाठी 28 बूथ उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. त्याचा माजी सैनिकांनी लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात

पालकमंत्री पांदणरस्ते योजनेचा आढावा योजनेतील कामांचे अचूक नियोजन करुन गती द्यावी - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील

Image
अमरावती, दि. 27 : जिल्ह्यात राबविण्यात येणारी पालकमंत्री पांदण रस्ते योजना आता राज्यभर राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात यंदा करावयाच्या सर्व कामांचा तांत्रिक अंगाने विचार करुन अचूक नियोजन करावे आणि या कामांना गती द्यावी, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे दिले.           जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विषयांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी अभिजित बांगर,  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, जिल्हा पोलीस अधिक्षक अभिनाशकुमार, जिल्हा उपवनसंरक्षक हेमंतकुमार मीना, महापालिका आयुक्त संजय निपाणे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.           जिल्ह्यातील गावांकडून पांदणरस्त्यांचे एकूण 2 हजार 404  प्रस्ताव प्राप्त आहेत. सर्व प्रस्तावांचा तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करुन कामाची गरज, उपलब्ध जागा, अतिक्रमणे हटविण्याची कारवाई आदी बाबी लक्षात घेऊन नियोजन करावे. जिल्ह्यातील ही योजना ग्रामीण भागासाठी तिची उपयुक्तता लक्षात घेऊन राज्यात अंमलात आली आहे.  त्यामुळे अधिकाधिक कामे पूर्ण होण्याच्या दृष्टीने काटेकोर व गतिमान कार्यवाही करावी, असे निर्देश श्री

पालकमंत्र्यांकडून पर्यटन कामांचा आढावा पर्यटन विकासकामांना गती द्यावी - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील

Image
अमरावती, दि. 27 : जिल्ह्यात पर्यटन विकासाची शक्यता लक्षात घेऊन अनेकविध कामांना शासनाने मंजूरी दिली आहे. ही कामे गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे दिले.             जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पर्यटन व विविध विषयांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, जिल्हा पोलीस अधिक्षक अभिनाशकुमार, जिल्हा उपवनसंरक्षक हेमंतकुमार मीना, महापालिका आयुक्त संजय निपाणे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.             पालकमंत्री श्री. पोटे- पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील संतभूमी, ऐतिहासिक स्थळे, वनसंपदा लक्षात घेऊन रिद्धपूर पर्यटन विकास, संगमेश्वर विकास, मुसळखेड येथील यशवंत महाराज संस्थान, श्रीक्षेत्र बहिरम, मालखेड निसर्ग पर्यटन केंद्र, मोर्शी येथील निसर्ग पर्यटन केंद्र, लोणी येथील संत गुलाबराव महाराज जन्म मंदिर व पालखी मार्ग, प्रल्हादपूर येथील भक्तीधाम, अमरावतीतील भीमटेकडी सौंदर्यीकरण अशा अनेक कामांना शासनाने निधी मंजूर केला आहे. काही कामे पूर्णत्वास जात आहेत. मात्र, विलंब होणा-या

शासन आणि खासगी कंपन्यांच्या परस्पर समन्वयाने वंचित घटकांचा विकास शक्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
            मुंबई ,  दि. २६ :   शासन आणि खासगी कंपन्यांच्या परस्पर समन्वयाने वंचित घटकांचा विकास करणे शक्य आहे. खासगी कंपन्यांकडे असलेले कौशल्य आणि शासकीय यंत्रणांचा एकत्रित वापर करून समाजातील मागास भागात विकासाची कामे करण्यासाठी सहभाग   या उपक्रमाची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.              सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. शासन आणि खासगी संस्थांद्वारे सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांद्वारे एकत्रित राबविण्यात येणारा सहभागांतर्गत विविध सामंजस्य करार करण्यात आले. या कार्यक्रमाला आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा ,  मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी ,  पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल ,  आदिवासी विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा ,  महिला व बालविकास विभागाच्या सचिव विनिता वेद-सिंघल ,  पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे आदींसह विविध कंपन्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले,   यापूर्वी खासगी संस्थांच्या मदतीने शासनाने राज्यातील एक हजार

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ‘डिजीटल इंडिया’चे स्वप्न पूर्ण करीत आहेत - केंद्रीय राज्यमंत्री मनोज सिन्हा

नवी दिल्ली, २५  :  महानेटच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण क्षेत्रासह शासकीय कार्यालयांना ब्रॉडबँडच्या माध्यमातून जोडण्याचे कार्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ‘डिजीटल इंडिया’चे स्वप्न ते पूर्ण करीत आहेत असे गौरवोद्गाार आज केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी लोकसभेत काढले.             लोकसभेत आज नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिक जिल्हयातील ब्रॉडबँड सेवेच्या अंमलबजावणीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्री. सिन्हा बोलत होते. श्री. सिन्हा म्हणाले, गेल्या महिन्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केंद्रीय दूरसंचार मंत्रालयात आले होते त्यांनी यावेळी केंद्र शासनाच्या ‘भारतनेट’ प्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात ‘महानेट’ ही मोठी योजना तयार केल्याचे सांगितले . अंत्यत आधुनिक सुविधांचा समावेश असलेल्या महानेट योजनेच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात टेली मेडीसीन सुविधा देण्यात येत आहे. राज्यातील विविध शैक्षणीक संस्थांना या योजनेंतर्गत ब्रॉडबँडने जोडण्यात आले आहे तसेच विविध शासकीय कार्यालयांनाही ब्रॉडबँडच्या माध्यमातून जोडण

१३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प अंतिम टप्प्यात आजपर्यंत लागली ११ कोटी ८८ लाख झाडे

Image
मुंबई, दि. २५ : हरित महाराष्ट्राचा ध्यास घेऊन सुरु झालेली वृक्ष लागवडीची चळवळ लोकचळवळीत रुपांतरित झाली असून या महत्वाकांक्षी उपक्रमात यावर्षी १ जुलै ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत १३ कोटी  वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. आज २५ तारखेपर्यंत राज्यात ११ कोटी ८८ लाख २९ हजार ०७८ झाडे लागली असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. श्री. मुनगंटीवार म्हणाले, आतापर्यंत झालेल्या वृक्ष लागवडीमध्ये २८ लाख ५८ हजार २७६ वृक्षस्नेहींनी सहभाग नोंदवला तर १ लाख ४५ हजार ६८३ स्थळांवर ही वृक्ष लागवड झाली आहे.  वृक्षलागवडीमध्ये वन विभागाने ६ कोटी ८७ लाख ३८ हजार ८८३ ,  वनेत्तर क्षेत्रात ४ कोटी १४ लाख ४७ हजार १९३ ,  माय प्लांट ॲप द्वारे २ लाख ३९ हजार ६१० ,  रोपे आपल्या दारी कार्यक्रमातून २ लाख ४९ हजार ३७६ ,  हॅलो फॉरेस्ट १९२६ द्वारे ९७७० वृक्ष लागवडीची ऑनलाईन पद्धतीने नोंद झाली आहे तर ऑफलाईन पद्धतीने ८१ लाख ४४ हजार २४६ रोपे लागल्याची माहिती वन विभागाकडे देण्यात आली आहे. राज्यात सर्वाधिक वृक्ष लागवड नांदेड जिल्ह्यात झाली आहे ती ७१ लाख ९२ हजार ८९३ इतकी आहे. त्यानंतर नाशिक जिल्हा द

दिलखुलास कार्यक्रमात श्राव्य लोकराज्य एकच लक्ष्य 13 कोटी वृक्ष

Image
                मुंबई ,   दि.  25 :  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जुलै महिन्यात प्रसिद्ध झालेला लोकराज्य अंक  “ एकच लक्ष्य  13  कोटी वृक्ष ”   यातील लेख  “ श्राव्य लोकराज्य ”   या स्वरूपात दिलखुलास कार्यक्रमात प्रसारित होणार आहे. आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून गुरूवार दि.  26  आणि शुक्रवार दि.  27  जुलै रोजी सकाळी  7.25  ते  7.40  या वेळेत या श्राव्य स्वरूपातील लेखांचे प्रसारण होणार आहे. निवेदक राजेश राऊत यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले आहे.            लोकराज्य अंकात वन विभागाचे सचिव विकास खारगे लिखित  ‘ हवा सर्वांचा सहभाग ’,  बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील लिखित  ‘ बांबू जीवनदायी कल्पतरू ’, तसेच वन विभागाचे विशेष अधिकारी डी.   एल. थोरात लिखित  ‘ वेगळी हरित क्रांती ’  या लेखांतून त्यांनी हरित महाराष्ट्र घडविण्याचा संदेश दिला आहे. ००००

सकल मराठा समाजाशी सरकार सदैव चर्चेस तयार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
मुंबई ,  दि. 25 : सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यात काढण्यात आलेल्या शांततापूर्ण मोर्चांनंतर ,  राज्य सरकारने त्याची दखल घेत विविध प्रकारचे निर्णय घेतले. आजही सकल मराठा समाजाशी चर्चा करण्यास राज्य सरकार तयार आहे ,  असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका निवेदनात म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की ,  राज्य सरकारने मराठा समाजासाठी अनेक निर्णय घेतले. विशेषत: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार पूर्णत: कटिबद्ध आहे. त्यामुळेच राज्य सरकारने यासंदर्भातील कायदा तयार केला. परंतु ,  उच्च न्यायालयाने त्या कायद्याला स्थगिती दिली. त्यानंतर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र ,  तेथे राज्य सरकारला उच्च न्यायालयाच्या आदेशावर स्थगिती मिळाली नाही. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न हा उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तथापि ,  यासंदर्भात संवैधानिक कारवाई पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने मागासवर्ग आयोग स्थापन केला आहे. त्या माध्यमातून कायद्याच्या कक्षेत संवैधानिक प्रस्ताव तयार केला जात आहे. सध्या हा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे राज्य सरकार आपल्या अखत्यारि

महाराष्ट्रातील शहरी गरिबांसाठी ५२ हजार ९३५ घरे मंजूर

Image
नवी दिल्ली ,  २४ : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) अंतर्गत महाराष्ट्रातील शहरी गरिबांसाठी ५२ हजार ९३५ घरे मंजूर झाली आहेत. देशात एकूण २ लाख ६७ हजार ५४६  घरे मंजूर करण्यात आली आहेत.  केंद्रीय गृह निर्माण व नगर विकास मंत्रालयाच्या केंद्रीय मान्यता व संनियंत्रण समितीच्या आज झालेल्या ३६ व्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील विविध शहरांतील गरिबांसाठी ५२ हजार ९३५ घरे मंजूर करण्यात आली आहेत. या बैठकीत महाराष्ट्रासह मध्यप्रदेश ,  गुजरात ,  उत्तर प्रदेश ,  पश्चिम बंगाल ,  बिहार ,  राजस्थान ,  छत्तीसगड ,  पंजाब आणि उत्तराखंड या राज्यांसाठी एकूण २ लाख ६७ हजार ५४६   घरे मंजूर करण्यात आली आहेत.
Image
प्रधानमंत्री पीक विमा योजनेला  31  जुलैपर्यंत मुदतवाढ अधिकाधिक शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळ ण्‍ यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई दि.  24:  खरीप हंगाम-  2018  साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत असून ,  या योजनेसाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव सादर करण्यास  31  जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा ,  यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा ,  असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. मुख्यमंत्री  श्री.  फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद ् वारे प्रत्येक जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकारी यांच्याशी संवाद साधून कृषी विभागाचा आढावा घेतला.  कृषिमंत्री चंद्रकांत पाटील हे सांगलीहून तर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत कोल्हापूर येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते. या आढावा बैठकीस कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव बिजय कुमार ,  मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी ,  कृषी आयुक्त आदी उपस्थित होते. प्रधान मंत्री  पीक विमा योजनेमध्

सुधा नरवणे यांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

मुंबई ,  दि .  24 :  आकाशवाणीच्या प्रसिद्ध निवेदिका आणि लेखिका सुधा नरवणे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या भावविश्वात एक अनोखे स्थान असणारा आवाज हरपला आहे,   अशा   शब्दात   मुख्यमंत्री   देवेंद्र   फडणवीस   यांनी   श्रद्धांजली   अर्पण   केली   आहे . मुख्यमंत्री   आपल्या   शोकसंदेशात   म्हणतात ,  श्रीमती नरवणे  आपल्या वैशिष्ट्यपूर्ण निवेदनशैलीसाठी प्रसिद्ध होत्या. भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. याबरोबरच त्यांचे साहित्यातील योगदानही लक्षणीय होते . विशेषतः त्यांच्या लघुकथा या वाचकप्रिय होत्या. त्यांच्या निधनाने आकाशवाणीला सर्वसामान्यांशी जोडणारा एक दुवा निखळला आहे.

समाजातील शेवटच्‍या माणसांपर्यंत विकास पोहोचल्याशिवाय सुराज्‍य निर्माण होणार नाही - मुख्‍यमंत्री

Image
             पुणे ,   दि. 23 : आता सुराज्‍याची लढाई लढावी लागेल ,   नव्‍या पिढीला सुराज्‍य द्यावे लागेल.    समाजातील शेवटच्‍या माणसांपर्यंत विकास पोहोचल्याशिवाय सुराज्‍य निर्माण होणार नाही ,   असे स्‍पष्‍ट मत मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्‍यक्‍त केले. पिंपरी-चिंचवड महापालिका व क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवडगाव येथे क्रांतीवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालय उभारण्यात येणार आहे. त्‍याच्‍या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.    अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट ,   खासदार श्रीरंग बारणे ,   आमदार लक्ष्‍मण जगताप ,   महेश लांडगे ,   आयुक्त श्रावण हर्डीकर ,  उपमहापौर शैलजा मोरे ,    क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे , क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे कार्यवाह ॲड सतिश गोरडे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्‍या    अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर नितीन काळजे होते.                मुख्‍यमंत्री श्री.फडणवीस म्‍हणाले ,   जो समाज इतिहास विसरतो ,   त्‍याला वर्तमानकाळ असतो ,   मात्र भव