Wednesday, July 18, 2018

म्हाडाच्या सदनिका सोडतीच्या अर्ज नोंदणीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

म्हाडाच्या सदनिका सोडतीच्या अर्ज नोंदणीचा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

·         अर्ज नोंदणीस आजपासून सुरुवात अर्ज स्वीकृती १९ जुलैपासून
·         कोकण मंडळातील 9018 तर नागपूर मंडळातील 1514 सदनिकांचा समावेश
·         प्रधानमंत्री आवास योजनेतील सदनिकांचाही समावेश

नागपूरदि. १८ :- महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) घटक असलेल्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या ९०१८ व नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या १५१४ सदनिकांच्या विक्री सोडतीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रियेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज रामगिरी निवासस्थानी करण्यात आला.
         या कार्यक्रमाला गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेतागृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकरगृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमारम्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर,नागपूर मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भीमनवार आदी उपस्थित होते.   
प्रधानमंत्री आवास योजनेमधील जास्तीत जास्त घरांचा समावेश सोडतीमध्ये करावा. पुढील दोन वर्षात दहा लाख परवडणारी घरे बांधण्याचे उद्दिष्ट पूर्तीसाठी नियोजन करावे,असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
         केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यात परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी हातभार लावण्यासाठी कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे परवडणाऱ्या घरांची राज्यात सर्वात मोठी म्हणजेच नऊ हजार अठरा सदनिकांची विक्रमी सोडत जाहीर करण्यात आली आहे. तर नागपूर मंडळाच्या 1514 घरांची सोडत काढण्यात येणार आहे. कोकण व नागपूर मंडळाच्या सोडतीसाठी अर्ज नोंदणीला आजपासून प्रारंभ झाला असून कोकण मंडळाच्या सोडतीकरिता प्राप्त अर्जाची संगणकय सोडत वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन या म्हाडाच्या मुख्यालयात दि. १९ ऑगस्ट २०१८  रोजी सकाळी दहा वाजता काढण्यात येणार आहे. कोकण मंडळातील सदनिकांसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 9 ऑगस्ट आहे.
 कोकण मंडळाच्या सोडतीत यंदा अत्यल्प उत्पन्न गटासाठी मीरा रोडबाळकूम ठाणेशिरढोण (ता. कल्याण)खोणी (ता. कल्याण)मौजे अंतर्लीखोणी हेदुटनेकोले (ता. कल्याण)मौजे उंबार्ली (ता. अंबरनाथ) येथील एकूण ४ हजार ४५५ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शिरढोण (ता. कल्याण) येथील १९०५खोणी (ता. कल्याण ) येथील २०३२ इतक्या अत्यल्प गटातील सदनिकांचा समावेश असून प्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गतच्या सदनिकांकरिता भारतात कुठेही स्वमालकीचे घर नसलेला परंतु एमएमआरने अधिसूचित केलेल्या सर्व क्षेत्रातील नागरिकच अर्ज करू शकतात. या योजनेतील घरांसाठी अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न तीन लाख इतके मर्यादित आहे.  अल्प उत्पन्न गटाकरिता मीरा रोडकावेसर ठाणेवेंगुर्ला सिंधुदुर्गविरार बोळींजखोणी (ता. कल्याण)मौजे अंतर्लीखोणी हेदुटनेकोले (ता. कल्याण)मौजे उंबार्ली (ता. अंबरनाथ) येथील ४३४१ सदनिकांचा समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटाकरिता बाळकूम (ठाणे)वेंगुर्ला (सिंधुदुर्ग),  मीरा रोडकुंवर बाव (रत्नागिरी)विरार बोळींज येथील एकूण २१५ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. तर उच्च उत्पन्न गटाकरिता वेंगुर्ला (सिंधुदुर्ग),  मीरा रोडकुंवर बाव (रत्नागिरी) येथील एकूण ७ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. 
    नागपूर मंडळाच्या सोडतीकरिता अर्जदारांच्या नोंदणीला आज दि. 18 जुलै रोजी दुपारी २ वाजेपासून प्रारंभ होणार असून दि. ८ ऑगस्ट २०१८ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत नोंदणी करता येणार आहे. नोंदणीकृत अर्जदारांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास दि. १९/०७/२०१८ रोजी दुपारी २ वाजेपासून प्रारंभ होणार असून दि. ९/८/२०१८ रोजी रात्री ११.५९ पर्यंत अर्ज भरता येणार आहे.
 नागपूर मंडळाच्या सोडतीत  अत्यल्प उत्पन्न गटासाठी वांजरा,  नवीन चंद्रपूर,  बेलरतोडी-नागपूरचिखली देवस्थान - नागपूरपिंपळगाव तह - हिंगणघाट (जि. वर्धा)दाभा येथील १३४७ सदनिकांचा समावेश आहे.  अल्प उत्पन्न गटाकरिता वांजरादाभा येथील ७७ सदनिकांचा समावेश आहे. तर मध्यम उत्पन्न गटाकरिता  नवीन चंद्रपूरचिखली देवस्थान - नागपूरयेथील ९० सदनिकांचा समावेश आहे.     
0000

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...