स्वस्थ भारत मिशनच्या आरोग्य तपासणी बसचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण




नागपूरदि. 20 : अमरावती जिल्ह्यातील अश्वमेध संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या स्वस्थ भारत मिशन प्रकल्पासाठी डिएक्ससी टेक्नॉलॉजीच्या सामाजिक उत्तर दायित्व निधीतून देण्यात आलेल्या अत्याधुनिक वैद्यकीय तपासणी सुविधा असलेल्या बसचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज रामगिरी निवासस्थानी झाले.
            यावेळी आमदार नरेंद्र पवारअश्वमेध संस्थेचे अध्यक्ष यशवंत पांडेडिएक्ससी टेक्नॉलॉजीच्या इआयटी सर्व्हिसेस लि.चे व्यवस्थापकीय संचालक मार्शल कॉर्रेयाभारतातील प्रमुख कमांडर गिरीश कुमारसीएसआयआर निरी चे डॉ. नितीन लाभशेठवारअंकित गुप्ताप्रकल्प समन्वयक राजेश साबू आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बसची चावी अश्वमेध संस्थेला देण्यात आली.
अश्वमेध संस्थेच्या वतीने स्वस्थ भारत मिशन अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील गावांमध्ये आरोग्य तपासणी शिबीरे घेण्यात येतात. यासाठी डिएक्ससी टेक्नॉलॉजीच्या वतीने तपासणीसाठी आवश्यक सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुविधा असलेली बस देण्यात आली आहे. ही बस अमरावती जिल्ह्यातील 50 गावांमध्ये जाऊन ग्रामस्थांच्या आरोग्याची तपासणी करणार आहे. यामध्ये रक्तातील हिमोग्लोबिनसाखरप्लेटलेट्स तपासणीलघवी तपासणीरक्तदाब तपासण्याची आधुनिक यंत्रणा व सुविधा आहे. तपासणी नंतर प्रत्येकाला आरोग्य पत्रिका देण्यात येणार आहे. तपासणीनंतर आवश्यक असल्यास डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात उपचार केले जाणार आहेत. यासाठी महाविद्यालयाचे सहकार्य मिळणार आहे.
या शिबिर काळात निरी संस्थेच्या वतीने गावातील पाण्याची व हवेतील प्रदूषणाची तपासणी करण्यात येणार आहे. यातून आरोग्याच्या समस्या कशामुळे उद्धभवत आहे हे जाणून घेऊन त्यावर उपाय सुचविण्यात येणार आहेत. तसेच ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यात येणार आहे.
०००

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती