Tuesday, July 17, 2018

अकोला जिल्ह्यातील नद्यांतील अनधिकृत बांधकामाला स्थगिती - पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील


नागपूर, दि. 17 : अकोला जिल्ह्यामध्ये मुख्यत्वे पूर्णा, मोर्णा या नद्या वाहतात. या नद्यांमधील जे अनधिकृत बांधकाम असेल त्याला स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली.
सदस्य गोपीकिसन बाजोरीया यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. राज्यमंत्री म्हणाले, नागरी सांडपाण्यामुळे होणाऱ्या नद्यांचे प्रदुषण रोखणे व राज्यातील जलस्त्रोत अबाधित ठेवणे व त्याचे संवर्धन करणे, यासंदर्भात सर्वंकष विचार करुन नागरी सांडपाण्यामुळे नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना करुन नद्यांच्या पाण्याची गुणवत्ता सुधारणे, त्यासाठी योग्य प्रकल्प तयार करणे, धोरण ठरविणे, प्रदुषणाच्या तीव्रतेनुसार योजनेतील प्रकल्पांचा प्राथम्यक्रम ठरविणे, प्रदुषित पट्टे निश्चित करणे व योजनेसाठी निधी उभारुन योजना स्वयंभू व शाश्वत व्हावी यासाठी राज्य शासनाने दि. 1 मार्च, 2014 च्या शासन निर्णयान्वये राज्य नदी संवर्धन योजना जाहीर केली आहे. त्यानुसारच अकोला जिल्ह्यातील नद्यांचे संवर्धन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...