अहमदनगर महापालिका पोट निवडणुक प्रचारादरम्यान झालेल्या हत्येप्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अहमदनगर महापालिका पोट निवडणुक प्रचारादरम्यान
झालेल्या हत्येप्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूरदि. 19 : अहमदनगर महानगरपालिकेच्या पोट निवडणुकीच्या प्रचारादरम्यान संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या झालेल्या हत्येप्रकरणी कायदा व नियमानुसारच कार्यवाही केली जाईलयात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाहीअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणालेझालेला प्रकार हा निंदनीय असून पोलीसांची कार्यवाही सुरु आहे. ज्यांच्या विरुद्ध पुरावे असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. पोलीस अधिकारी यांचा थेट सहभाग असेल तर त्यांच्यावर ही कारवाई केली जाईल. भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून अहमदनगर शहरात सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत प्रस्तावित आहे. तसेच गुन्हा क्र. 136/2018 मध्ये उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्तीबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे.
            या चर्चेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेसदस्य अनिल परब यांनी सहभाग घेतला.
0000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती