Posts

Showing posts from April, 2024

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

Image
  जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण                    अमरावती, दि. 1 (जिमाका): महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 64 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी राष्ट्रध्वज वंदन, राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीतानंतर जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी हस्तांदोलन करून त्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उपजिल्हाधिकारी विजय जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, सूचना प्रचारण अधिकारी मनिष फुलझेले, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत मस्के, तहसिलदार भाग्यश्री देशमुख तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 00000

मुख्य शासकीय सोहळ्यात विभागीय आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण

Image
  जिल्ह्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा मुख्य शासकीय सोहळ्यात विभागीय आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण                अमरावती, दि. 1 (जिमाका): महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 64 व्या वर्धापन दिनोत्सवाचा सोहळा जिल्ह्यात सर्वत्र उत्साह व मंगलमय वातावरणात पार पडला. येथील जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.               सोहळ्याला विशेष पोलिस   महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, सहायक जिल्हाधिकारी मीनू पी. एम., सहायक जिल्हाधिकारी नरेश अकुनूरी, जिल्हा परिषदेचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.                सोहळ्याच्या प्रारंभी   राष्ट्रध्वज वंदन, राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीतानंतर विभागीय आयुक्त श्रीमती. डॉ. पाण्डेय यांनी खुल्या जीपमधून विविध पथकांचे निरीक्षण केले. जिल्हा पोलीस दलासह वाहतूक शाखा, शहर पोलीस, अग्निशमन दल, दामिनी पथक, जलद प्रतिसाद पथक, रुग्णवाहिका वाहन, वज्र वाहन, फॉरेन्सीक वाहन,

नोंदणी न झालेल्या मतदारांनी नोंदणी करावी - जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Image
  नोंदणी न झालेल्या मतदारांनी नोंदणी करावी - जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन अमरावती, दि. 30 (जिमाका): लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदारांनी उत्साहात मतदान करुन मतदानाची टक्केवारी वाढवली. परंतु काही मतदार संघामध्ये मतदारांचे नाव मतदान यादीमधून गहाळ किंवा सापडत नसल्याचे तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानुषंगाने ज्या मतदारांचे नांवे सापडत नसेल किंवा गहाळ झालेली असेल अशा मतदारांनी मतदार यादीमध्ये समाविष्ट करणेकरीता फार्म क्र. 6 भरुन संबंधित बीएलओ, तहसिलदार कार्यालय किंवा ऑनलाईनव्दारे नोंदणी करुन मतदार यादी समाविष्ट करुन घ्यावे. मतदार नोंदणी प्रक्रिया निरंतर सुरु असून त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.              अमरावती लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या मतदानाच्या दिवशी काही मतदान केंद्रावर मतदारांचे नाव गहाळ झाल्याबाबत काही वृत्तपत्रामध्ये बातम्या प्रसिध्द झाले. भारत निवडणूक आयोगाने दि. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करणे, दुबार, मयत, स्थलांतरीत करणे व दुरुस्तीकरीता दि. 1 जुन 2023 पासुन जिल्ह्यामध्ये कार्यक्रम र

महाराष्ट्र दिनानिमित्त जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर मुख्य सोहळा

Image
  महाराष्ट्र दिनानिमित्त जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर मुख्य सोहळा             अमरावती, दि. 30 (जिमाका): महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 64 व्या वर्धापनदिनानिमित्त ध्वजारोहणाचा शासकीय समारंभ उद्या , दि. 1 मे रोजी सकाळी 8 वाजता जवाहरलाल नेहरु स्टेडियम, मोर्शी रोड अमरावती येथे होईल. विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. मुख्य ध्वजारोहण सोहळा राज्यभर एकाच वेळी सकाळी आठ वाजता होणार असल्याने सकाळी 7.15 ते 9 वाजेदरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कुठलाही शासकीय समारंभ किंवा अर्धशासकीय सोहळा घेण्यात येऊ नये. तसेच सर्वांनी राष्ट्रीय पोषाख परिधान करावा,   अशा सूचना जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. 00000  

जिल्हास्तरीय खरीप हंगाम नियोजन बैठक; खरीप हंगामाचे सुक्ष्म नियोजन करा- जिल्हाधिकाऱ्यांची कृषी विभागाला सूचना

Image
  जिल्हास्तरीय खरीप हंगाम नियोजन बैठक; खरीप हंगामाचे सुक्ष्म नियोजन करा- जिल्हाधिकाऱ्यांची कृषी विभागाला सूचना                  अमरावती, दि. 29 (जिमाका):   आगामी काही दिवसात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा हंगाम आहे. जिल्ह्यात खते, बियाणे, कृषी निविष्ठा आदींची कमतरता जाणवणार नाही, याबाबत दक्षता घेऊन खरीप हंगामाचे सुक्ष्म नियोजन करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी कृषी विभागाला दिल्या.                 जिल्हास्तरीय खरीप हंगाम नियोजन बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महसूल भवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहूल सातपुते, ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने, महाराष्ट्र कृषी पणन मंडळाचे विभागीय व्यवस्थापक दिनेश डागा, महाउर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल तायडे, महाबिजचे जिल्हा व्यवस्थापक एस.पी. देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.                        जिल्ह्यात खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र 6 लाख 81 हजार हेक्टर असून, सोयाबीन, कापूस, तूर ही मुख्य पिके आ

07- अमरावती लोकसभा मतदार संघ-अंतिम टक्केवारी 63.67

Image
  लोकसभा सार्वत्रिक निवडणुक; मतदारसंघात सर्वत्र उत्साहात मतदान 07- अमरावती लोकसभा मतदार संघ-अंतिम टक्केवारी 63.67 दिव्यांग मतदारांनी सुविधांचा लाभ घेत केले मतदान, सर्वत्र शांतततेत मतदान मतदानाची टक्केवारी वाढवून शासकीय जनजागृतीला नागरिकांनी दिला उत्तम प्रतिसाद अमरावती, दि. 27 (जिमाका): 07- अमरावती लोकसभा मतदारसंघात भारत निवडणूक आयोगाने सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत मतदानाची वेळ निश्चित केली होती. त्यानुसार सकाळी सात वाजतापासूनच मतदारसंघात मतदानाला उत्साहात सुरुवात झाले. मतदारांनी मतदानाची टक्केवारी वाढवून शासकीय जनजागृतीला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. अमरावती लोकसभा मतदारसंघात अंतिम आकडेवारीनुसार सरासरी 63.67 टक्के मतदानाची नोंद झाली. विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान मतदानाची विधानसभा मतदारसंघनिहाय अंतिम टक्केवारी याप्रमाणे : बडनेरा मतदार संघात 55.78, अमरावती मतदार संघात 57.51, तिवसा मतदार संघात 64.14, दर्यापूर मतदार संघात 66.88, मेळघाट मतदार संघात 71.55, अचलपूर मतदार संघात 68.84 टक्के असे एकुण अमरावती लोकसभा मतदार संघात 63.67 टक्के मतदान झाले. लोकशाहीचा उत

मतदानाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केली मतदान केंद्रांची पाहणी; केंद्रांवरील सोयी-सुविधांचा घेतला आढावा

Image
  मतदानाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केली मतदान केंद्रांची पाहणी; केंद्रांवरील सोयी-सुविधांचा घेतला आढावा            अमरावती, दि. 25 (जिमाका):   उद्या होणाऱ्या सार्वत्रिक लोकसभा मतदानाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी-सुविधांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी काही मतदान केंद्रांना भेटी दिल्या. यावेळी त्यांच्या सोबत मनपा आयुक्त देविदास पवार, जि.प.चे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी   विजय भटकर, बडनेरा मतदार संघ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विजय जाधव, अमरावती तहसिलदार विजय लोखंडे आदी यावेळी उपस्थित होते.             जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी सेंट थॉमस इंग्लिश स्कुल   येथील मतदान केंद्राची पाहणी केली. त्यानंतर जूनी वस्ती बडनेरा येथील ऊर्दू प्राथमिक शाळा तसेच पंचायत समिती, भातकुली अंतर्गत उत्तमसरा प्राथमिक शाळा येथील मतदान केंद्रांची पाहणी केली. मतदान केंद्रावरील पिण्याच्या पाण्याची सुविधा, कनेक्टीव्हिटी, वीजेचा पुरवठा, शौचालयाची सुविधा, दिव्यांग मतदारांसाठी व

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक; कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी - जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Image
  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक; कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी - जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश                अमरावती, दि.25 (जिमाका) :   लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. नागरिकांना हक्क बजावता यावा यासाठी राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे मतदानाच्या दिवशी   सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.   अमरावती लोकसभा मतदारसंघातील सर्व कामगारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी भरपगारी सुट्टी द्यावी, असे आदेश जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी निर्गमित केले आहे.               उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या 5 एप्रिल रोजीच्या शासन निर्णयानुसार निवडणुक होणाऱ्या मतदान क्षेत्रात ही सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने यांना लागू राहील. खासगी कंपन्या, सर्व दुकाने, निवासी हॉटेल्स, उपाहारगृहे, नाट्यगृहे, मॉल्स, रिटेलर्स, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, व्यापार, औद्योगिक उपक्रम आदींचा त्यात समावेश आहे.   अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना

लोकसभा सार्वत्रिक निवडणुक; मतदानासाठी यंत्रणा सज्ज मतदारांनी निर्भयपणे व निष्पक्षपणे आपल्या मतदानाचा हक्क बजावावा - जिल्हाधिकारी सौरभ कटियार

Image
  लोकसभा सार्वत्रिक निवडणुक; मतदानासाठी यंत्रणा सज्ज मतदारांनी निर्भयपणे व निष्पक्षपणे आपल्या मतदानाचा हक्क बजावावा - जिल्हाधिकारी सौरभ कटियार         अमरावती, दि. 25 (जिमाका): लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2 024 च्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणेची सज्जता असून मतदारांनी निर्भयपणे व निष्पक्षपणे आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज पत्रकार परिषदेत केले. यावेळी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस अधीक्षक ग्रामीण विशाल आनंद, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.             07-अमरावती (अ.जा.) लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक 28 मार्च रोजी अधिसूचना जारी करण्यात आली. दि. 4 एप्रिलपर्यंत उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात आले. तर दि. 8 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. अमरावती मतदार संघाची निवडणुक दुसऱ्या टप्प्यामध्ये उद्या, शुक्रवार दि. 26 रोजी मतदान होणार असून आयोगाने मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ठरवून दिलेली आहे. तर दि. 4 जून रोजी मतमोजणी असून आदर्श आचारसंहिता गु

शुक्रवारच्या मतदानासाठी पथके मतदान साहित्यांसह रवाना

Image
  शुक्रवारच्या मतदानासाठी पथके मतदान साहित्यांसह रवाना पोलींग पार्टींना मतदान साहित्याचे वितरण ; मतदान पथके मतदानस्थळी रवाना 18 लाख 36 हजार 078 मतदार  बजावणार   मतदानाचा हक्क जिल्ह्यात 1 हजार 983 मतदान केंद्र ; मेळघाटात   354 सर्वाधिक मतदान केंद्र   अमरावती, दि. 25 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 07-अमरावती (अ.जा.) लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवार, दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत जिल्ह्यातील मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येईल. अमरावती मतदारसंघात एकूण 18 लाख 36 हजार 078 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी 1 हजार 983 मतदान केंद्र असणार आहेत. जिल्ह्यातील या मतदान केंद्रासाठी ईव्हीएम मशीन व मतदानासाठी लागणारे आवश्यक साहित्य, साधनसामुग्रीचे वितरण मतदान चमूंना आज वितरीत करण्यात असून मतदान पथके मतदानस्थळी रवाना झाली आहेत. जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश असून तेथील मतदान केंद्राकरिता ईव्हीएम मशीन व साधनसामग्रींचे बडनेरा मतदारसंघाकरिता श्री. शिवाजी बीपीएड कॉलेज या ठिकाणाहून वितरण झाले. अमरावती मतदारसंघाकरिता ईव्हीएम गोडावून न.

खर्च निरीक्षक यांचेकडून उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाच्या लेख्याची तिसरी तपासणी

  खर्च निरीक्षक यांचेकडून उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाच्या लेख्याची तिसरी तपासणी              अमरावती,   दि.25(जिमाका) : अमरावती लोकसभा मतदार संघात एकूण 37 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. उमेदवारांच्या लेख्यांच्या दुसऱ्या तपासणीवेळी एकूण 37 उमेदवारांपैकी दोन उमेदवार अनुपस्थित होते. अनुपस्थित असलेल्या उमेदवारांना 48 तासांच्या आत निवडणूक खर्चाचे लेखे निवडणूक सनियंत्रण व खर्च कक्षात सादर करण्याची सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांनी दिली असून विहित मुदतीत खर्च सादर न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे कळविण्यात आले आहे.                         उमेदवारांच्या खर्चावर देखरेख ठेवण्याकरीता खर्च निरीक्षक अनुपकुमार वर्मा   यांची नेमणूक भारत निवडणूक आयोगाने केलेली आहे. काल दि. 24 एप्रिल रोजी उमेदवारांच्या लेख्यांची तिसरी तपासणी खर्च निरीक्षकांकडून करण्यात आली. यामध्ये तीन उमेदवारांनी तिसऱ्या तपासणीच्या वेळी त्यांच्या दैनंदिन खर्चाचा लेखा सादर केला आहे. परंतू तो शॅडो खर्च नोंदवहीसोबत तुलनात्मकरित्या जुळून येत नाही. तसेच त्यांच्या खर्चाचा काही भाग त्या उमेदवारांनी सादर