लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024; अमरावती मतदारसंघात 37 उमेदवारांमध्ये लढत तर 19 उमेदवारांची माघार

 




लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024;

अमरावती मतदारसंघात 37 उमेदवारांमध्ये लढत तर 19 उमेदवारांची माघार

 

            अमरावती, दि. 8 (जिमाका): सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 अंतर्गत 7- अमरावती (अ.जा.) लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याच्या आजच्या अंतिम दिवशी 19 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे लोकसभा मतदारसंघाकरिता आता 37 उमेदवारांमध्ये निवडणूकीची लढत होणार आहे. दरम्यान सर्व उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप देखील आज करण्यात आले आहे. याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रपरिषदेत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी माहिती दिली.

 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे अमरावती लोकसभा निवडणुक संदर्भातील माहिती देण्याकरीता पत्रकार परिषदचे आयोजन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विजय जाधव, उप जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले की, अमरावती लोकसभा मतदारसंघाची  सार्वत्रिक निवडणूक 26 एप्रिल 2024 रोजी होणार असून प्रशासन निवडणूकीसाठी सज्ज झाले आहे. मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याबाबत सूचना देण्यात आले आहे. तसेच उमेदवाराव्दारे प्रचाराकरिता वापरण्यात येणाऱ्या प्रचार साहित्याच्या खर्चाची नोंद करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

 

नामनिर्देश अर्ज मागे घेतल्यानंतर आता 07-अमरावती लोकसभा मतदार संघात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे नाव, पक्ष व चिन्ह पुढीलप्रमाणे आहे.

 

       राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पक्षाचे उमेदवार : श्रीमती नवनीत रवि राणा(भारतीय जनता पार्टी-कमळ), बळवंत बसवंत वानखडे(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस-हात), संजयकुमार फत्तेसींग गाडगे (बहूजन समाज पार्टी-हत्ती), इंजी. अविनाश हरिषचंद्र धनवटे(पिपल पार्टी ऑफ इंडीया डेमोक्रॅटीक-फळांची टोपली), श्री. आनंदराज यशवंत आंबेडकर(रिपब्लिकन सेना-गॅस सिलेंडर),  श्री.गणेश नानाजी रामटेके (अखिल भारतीय परीवार पार्टी-किटली), श्री.गाजी सादोद्दीन जहिर अहमद (राष्ट्रीय ओलमा कौंसील-ऑटो रिक्षा), दिगांबर वामन भगत(नकी भारतीय एकता पार्टी-स्पॅनर),  श्री. दिनेश गणेशराव बुब(प्रहार जनशक्ती पक्ष-शिट्टी), श्री.नरेंद्र बाबुलाल कठाने(देश जनहित पार्टी-शाळेचे दप्तर), श्री.भाऊराव संपतराव वानखडे(ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक-सिंह), ॲड राजु मधुकरराव कलाने (बहूजन भारत पार्टी-जहाज), श्रीमती. सुषमा गजानन अवचार(जय विदर्भ पार्टी-रुम कुलर)

 

        अपक्ष : श्री. अनिल ठवरे ऊर्फ अनिलकुमार नाग बौद्ध(अपक्ष-पेनाची निंब सात किरणांसह), श्री.अरुण यंशवंतराव भगत (अपक्ष-हातगाडी), किशोर भिमराव लबडे(अपक्ष-एअर कंडिशनर), श्री. किशोर ज्ञानेश्वर तायडे(अपक्ष-कपाट), गौतम उर्फ अनंता रामदास इंगळे(अपक्ष-रोड रोलर), श्रीमती तारा सुरेश वानखडे(अपक्ष-दुरदर्शन), श्री. प्रभाकर पांडुरंग भटकर(अपक्ष-लॅपटॉप), श्री.प्रमोद रामकृष्ण चौरपगार(अपक्ष-हिरा), ॲड. पृथ्वीसम्राट मुकिंदराव दिपवंश(अपक्ष-भाला फेक), भरत चंपतराव यांगड(अपक्ष-नागरिक), श्री.मनोहर कृष्णाजी कुऱ्हाडे(अपक्ष-काचेचा पेला), मानकर ज्ञानेश्वर काशीराव (अपक्ष-काडे पेटी), श्री. रवी गुणवंत  वानखडे(अपक्ष-टेबल), श्री. राजु महोदवराव सोनोने(अपक्ष-खाट), श्री.राजेश तुळशिराम खडे(अपक्ष-सफरचंद), श्रीमती. वर्षा भगवंत भगत(अपक्ष-बॅटरी टॉर्च), श्रीकृष्ण सखाराम क्षिरसागर(अपक्ष-संगणक), श्री.सतिश यंशवंतराव गेडाम(अपक्ष-ट्रक), श्रीमती. सुमित्रा साहेबराव गायकवाड(अपक्ष-प्रेशर कुकर), श्री. सुरज धनराज नागदवने(अपक्ष-पेट्रोलपंप),  श्री. सुरेश पुंडलीक मेश्राम(अपक्ष-ईस्त्री), श्रीमती सोनाली संजय मेश्राम(अपक्ष-बॅट), श्री. संदिप बाबुलाल मेश्राम(अपक्ष-गॅस शेगडी), श्री.हिम्मत भिमराव ढोले(अपक्ष-शिवणयंत्र).

 

         मागे घेतलेल्या उमेदवारांचे नावे: राहुल लक्ष्मण मोहोड (बहुजन महा. पार्टी), श्री. प्रविण दादाराव मोखळे(अपक्ष), श्री. नितेश बाबुलाल तायडे(अपक्ष), श्री. नाना किसनराव सावरकर(अपक्ष), श्री. अनुप मधुकर खडसे(अपक्ष), श्री. सतिश गुंडमराव मोहोड(अपक्ष), डॉ. राजेंद्र रामकृष्ण गवई(रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया), श्री. धनंजय रमेश लोणारे(अपक्ष), श्री. किशोर रामलाल पिवाल(अपक्ष), श्री. आशिषकुमार अशोकराव गावंडे(अपक्ष), ॲड. राजु बक्शी जामनेकर(अपक्ष), श्री.मयूर भारतराव इंगोले (अपक्ष), श्री.बळवंत हरिभाऊ वानखडे(अपक्ष), श्री.धनराज किसनराव शेंडे(अपक्ष), श्री.गोपाल यशवंतराव तंतरपाळे(अपक्ष), श्री.प्रविण गणेश आठवले(अपक्ष), श्रीमती मिनाक्षी सोमेश्वर करवाडे (भिम सेना), श्री.धिरज भाऊराव वानखडे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A)), श्री.प्रभूदास शेषराव मोहोड (बहूजन मुक्ती पार्टी).

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती