Tuesday, April 30, 2024

महाराष्ट्र दिनानिमित्त जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर मुख्य सोहळा

 


महाराष्ट्र दिनानिमित्त जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर मुख्य सोहळा

            अमरावती, दि. 30 (जिमाका): महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 64 व्या वर्धापनदिनानिमित्त ध्वजारोहणाचा शासकीय समारंभ उद्या , दि. 1 मे रोजी सकाळी 8 वाजता जवाहरलाल नेहरु स्टेडियम, मोर्शी रोड अमरावती येथे होईल. विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. मुख्य ध्वजारोहण सोहळा राज्यभर एकाच वेळी सकाळी आठ वाजता होणार असल्याने सकाळी 7.15 ते 9 वाजेदरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कुठलाही शासकीय समारंभ किंवा अर्धशासकीय सोहळा घेण्यात येऊ नये. तसेच सर्वांनी राष्ट्रीय पोषाख परिधान करावा,  अशा सूचना जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.

00000

 

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...