खर्च निरीक्षक यांचेकडून उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाच्या लेख्याची तिसरी तपासणी

 

खर्च निरीक्षक यांचेकडून उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाच्या लेख्याची तिसरी तपासणी

            अमरावती,  दि.25(जिमाका) : अमरावती लोकसभा मतदार संघात एकूण 37 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. उमेदवारांच्या लेख्यांच्या दुसऱ्या तपासणीवेळी एकूण 37 उमेदवारांपैकी दोन उमेदवार अनुपस्थित होते. अनुपस्थित असलेल्या उमेदवारांना 48 तासांच्या आत निवडणूक खर्चाचे लेखे निवडणूक सनियंत्रण व खर्च कक्षात सादर करण्याची सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांनी दिली असून विहित मुदतीत खर्च सादर न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे कळविण्यात आले आहे.

           

            उमेदवारांच्या खर्चावर देखरेख ठेवण्याकरीता खर्च निरीक्षक अनुपकुमार वर्मा  यांची नेमणूक भारत निवडणूक आयोगाने केलेली आहे. काल दि. 24 एप्रिल रोजी उमेदवारांच्या लेख्यांची तिसरी तपासणी खर्च निरीक्षकांकडून करण्यात आली. यामध्ये तीन उमेदवारांनी तिसऱ्या तपासणीच्या वेळी त्यांच्या दैनंदिन खर्चाचा लेखा सादर केला आहे. परंतू तो शॅडो खर्च नोंदवहीसोबत तुलनात्मकरित्या जुळून येत नाही. तसेच त्यांच्या खर्चाचा काही भाग त्या उमेदवारांनी सादर केला नाही. अशा उमेदवारांना जिल्हाधिकारी यांनी नोटीस जारी केली असून 48 तासांच्या आत आपले म्हणणे लिखित स्वरुपात निवडणूक खर्च सनियंत्रण कक्षात विहित मुदतीत सादर करावी. सादर न केल्यास शॅडो खर्च नोंदवहीनुसारच हा खर्च उमेदवारांना मान्य असे गृहीत धरुन त्यांच्या निवडणूक खर्चामध्ये समाविष्ट करण्यात येईल व ही तफावत संबंधित उमेदवारास मान्य नसल्यास त्यांनी आपल्या खुलाश्यामध्ये तो मान्य नसल्याच्या सुस्पष्ट कारणांसह जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे लिखित स्वरुपात सादर करावा लागेल. ते निवेदन खर्च निरीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा खर्च सनियंत्रण समितीसमोर सादर करण्यात येईल. त्यानुसार ही समिती या तफावतीबाबत विविध कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करेल. त्याचबरोबर विहित मुदतीत खर्च सादर न करणाऱ्या उमेदवारांविरुद्ध भादंवि कलम 171 (1) अन्वये तक्रार दाखल करण्यात येईल. तसेच वाहने, सभा इत्यादीसाठी देण्यात आलेल्या सर्व परवानग्या तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येईल, असे यावेळी कळविण्यात आले.

                       

          तिसऱ्या तपासणी अंती उमेदवारनिहाय खर्च हा तात्पुरत्या स्वरुपाचा असून निकालानंतर 1 जुलै 2024 रोजी आयोजित लेखा ताळमेळ बैठकीमध्ये खर्चास अंतिम स्वरुप देण्यात येईल. खर्चाचा ताळमेळ झाल्यानंतरच उमेदवारांचा खर्च भारत निवडणुक आयोगाकडे सादर केला जाईल. तपासणीचे वेळी खर्च निरीक्षक अनुपकुमार वर्मा, नोडल अधिकारी चंद्रशेखर खंडारे, सहायक नोडल अधिकारी विजय देशमुख, डॉ. दिनेश मेतकर, तसेच संपर्क अधिकारी प्रमोद पालवे व उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

                                                         000000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती