'दिलखुलास'मध्ये अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची'लोकसभा निवडणूकांची तयारी' यावर मुलाखत



 'दिलखुलास'मध्ये अमरावतीचे जिल्हाधिकारी  सौरभ कटियार यांची'लोकसभा निवडणूकांची तयारी' यावर मुलाखत

 

            मुंबई, दि. २४ : 'लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ अमरावती जिल्हा प्रशासन सज्ज' याविषयी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी  सौरभ कटियार यांची माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास'  कार्यक्रमात शुक्रवार दि. २६  एप्रिल २०२४  रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत मुलाखत प्रसारित होणार आहे.अमरावती जिल्ह्याच्या प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी अपर्णा यावलकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

 

      अमरावती जिल्ह्यात  निवडणुकीचे कामकाज पार पडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही, मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली तयारी, मतदार जनजागृती उपक्रम, कायदा व सुव्यवस्थेबाबत नियोजन, सर्व घटकातील मतदारांसाठी  करण्यात आलेल्या सोयीसुविधा याबाबत अमरावतीचे जिल्हाधिकारी  सौरभ कटियार यांनी माहिती दिली आहे.

००००

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती