लोकसभा सार्वत्रिक निवडणूक; कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी द्यावी-सहायक कामगार आयुक्तांचे आदेश

 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक; कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी द्यावी-सहायक कामगार आयुक्तांचे आदेश

             अमरावती, दि.22 (जिमाका) :  लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. नागरिकांना हक्क बजावता यावा यासाठी राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे यादिवशी  सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.  अमरावती लोकसभा मतदारसंघातील सर्व कामगारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी भरपगारी सुट्टी द्यावी, असे आदेश सहायक कामगार आयुक्तांनी जारी केले आहेत.

 

            उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग यांचे परिपत्रकानुसार निवडणुक होणाऱ्या मतदान क्षेत्रात ही सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने यांना लागू राहील. खासगी कंपन्या, सर्व दुकाने, निवासी हॉटेल्स, उपाहारगृहे, नाट्यगृहे, मॉल्स, रिटेलर्स, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, व्यापार, औद्योगिक उपक्रम आदींचा त्यात समावेश आहे.  अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुट्टीऐवजी कमीत कमी दोन ते तीन तासाची सवलत देता येईल. मात्र त्यासाठी आस्थापना किंवा कारखाना मालकाने जिल्हाधिकारी किंवा महापालिका आयुक्त यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. मतदानासाठी सुट्टी किंवा पूर्वपरवानगीने सवलत न दिल्यास आस्थापना धारकाविरूद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती