जिल्ह्यातील सर्व न्यायालयात 5 मेला राष्ट्रीय लोकअदालत

 

जिल्ह्यातील सर्व न्यायालयात  5 मेला राष्ट्रीय लोकअदालत

              अमरावती दि. 08 (जिमाका)  : अमरावतीसह जिल्ह्यातील सर्व न्यायालयात रविवार दि. 5 मे 2024 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दाखल व दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीने व सामंजस्याने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत.

 

          राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणामार्फत  लोकअदालतीचे आयोजन होणार असून यामध्ये सहभागासाठी कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. संबंधितांनी तडजोडप्राप्त प्रलंबित खटले तडजोडीने व सामंजस्याने मिटविण्यासाठी संबंधित न्यायालयात अर्ज करावा, तसेच दाखलपूर्व प्रकरणांबाबत नजिकच्या संबंधित जिल्हा किंवा तालुका न्यायालय यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

          राष्ट्रीय लोकअदालती समक्ष प्रकरणे सामंजस्याने व तडजोडीने मिटवावेत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. देशपांडे  तसेच सचिव जी. आर. पाटील यांनी केले आहे.

 

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती