सर्व खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांनी ई-आर 1 सादर करण्यासाठी ऑनलाइन सुविधांचा लाभ घ्यावा

 

सर्व खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांनी ई-आर 1 सादर करण्यासाठी ऑनलाइन सुविधांचा लाभ घ्यावा

 

        अमरावती, दि.16 (जिमाका) : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांच्याकडून पुरविण्यात येणाऱ्या रोजगार विषयक सर्व सेवा आता ऑनलाइन करण्यात आलेल्या आहेत. या सुविधा ऑनलाइन मिळणार असून त्यासाठी  www.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. तसेच उद्योजक आस्थापना यांनी सेवायोजन कार्यालय रिक्त पदे अधिसूचित करण्याची सक्ती करणार कायदा 1959 व नियमावनी 1960 कलम 5(1) व कलम 5(2) अन्वये त्रैमासिक ई-आर 1 ऑनलाइन सादर करणे बंधनकारक आहे.

 

         मार्च- 2024 अखेर संपणाऱ्या  त्रैमासिक करिता ई-आर 1 या प्रपत्राची माहिती वरील संकेतस्थळावर सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी उद्योजक, आस्थापना यांनी त्यांचे युजर आयडी व पासवर्डच्या माध्यमातून लॉगिन करून ऑनलाइन सादर करावयाची आहे.  त्याबाबतचे प्रमाणपत्र संकेतस्थळावरून प्राप्त करून घ्यावयाचे आहे. ऑनलाइन ई-आर 1 सादर करताना काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती या कार्यालयाशी अथवा दूरध्वनी क्रमांक 0721-2566066 यावर संपर्क साधावा. ई-आर 1 सादर करण्याची अंतिम मुदत एप्रिल, 2024 आहे. ई-आर 1 ऑनलाइन सादर न करणाऱ्या कसुरदार आस्थापनावर विहित नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. याची कृपया नोंद घेण्यात यावी, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र प्रांजली बारस्कर यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती