Thursday, April 18, 2024

अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन

 

अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन

             अमरावती, दि. 18 (जिमाका): पोलिस ठाणे सिटी कोतवाली अमरावती (शहर) अंतर्गत एका अनोळखी इसमाचा मृतदेह रेल्वे उडानपुलाजवळ रेल्वे स्टेशन चौक येथे सापडला. मृतकाचे अंदाजे वय 50  वर्षे असून मृतकाचा बांधा सडपातळ, रंग काळा, उंची 5 फुट 5 इंच, चेहरा लाबंट, केस काळे पाढंरे लांब, दाढीचे केस काळे पांढरे व मिशी पाढंरी काळी लांब असे आहे.

               मृतकाच्या नातेवाईकाचा शोध लागावा व अनोळखी इसमाची ओळख पटविण्यास पोलीस नियंत्रण कक्ष, अमरावती शहर दुरध्वनी क्रमांक - 0721-2672001 किंवा वपोनी, मनोहर कोटनाके  भ्रमणध्वनी क्रं. 8390151921, तसेच पोहेकॉ मनोज काळपांडे भ्रमणध्वनी क्रं. 7083091678 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस स्टेशन सिटी कोतवाली, अमरावती यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...