अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन
अमरावती, दि. 12 (जिमाका): पोलिस ठाणे
सिटी कोतवाली अमरावती (शहर) अंतर्गत एका अनोळखी इसमाचा मृतदेह पारश्री हॉस्पीटल समोर,
खापर्डे बगीचा येथे सापडला. मृतकाचे अंदाजे वय 60 ते 65 वर्षे असून मृतकाचा बांधा मजबुत,
रंग सावळा, उंची 5 फुट 6 इंच, चेहरा गोल, दाढी पांढरी केस पांढरे, डोळे बंद, उजव्या
हातावर नाव गोंदलेले अस्पष्ट आहे.
मृतकाच्या नातेवाईकाचा शोध लागावा व अनोळखी इसमाची
ओळख पटविण्यास पोलीस नियंत्रण कक्ष, अमरावती शहर दुरध्वनी क्रमांक - 0721-2672001 किंवा
अंमलदार यांचा भ्रमणध्वनी क्रं. 9823221021 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन
पोलीस स्टेशन सिटी कोतवाली, अमरावती यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment