अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन

 

अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन

             अमरावती, दि. 22 (जिमाका): पोलिस ठाणे सिटी कोतवाली अमरावती (शहर) अंतर्गत एका अनोळखी इसमाचा उपचारा दरम्यान इर्विन हॉस्पीटल येथे मृत्यू झाला. मृतकाचे अंदाजे वय 55 वर्षे असून मृतकाचा बांधा सडपातळ, रंग निमगोरा, उंची 5 फुट 6 इंच, चेहरा लांबट, टक्कल पडलेले असून, डोक्याचे केस व दाढी मीशीचे केस काळे-पांढरे आहे. अंगात जांभळ्या रंगाचे फुल बाह्याचे शर्ट व हिरव्या रंगाचा फुल पँन्ट घातलेला होता.

 

              मृतकाच्या नातेवाईकाचा शोध लागावा व अनोळखी इसमाची ओळख पटविण्यास पोलीस नियंत्रण कक्ष, अमरावती शहर दुरध्वनी क्रमांक - 0721-2672001 किंवा वपोनी मनोहर कोटनाके भ्रमणध्वनी क्रं. 8390151921 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस स्टेशन सिटी कोतवाली, अमरावती यांनी केले आहे.

                                                                   00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती