Posts

Showing posts from June, 2022

शासकीय योजना तयार करण्यासाठी अर्थ व सांख्यिकी संचालनालयाची माहिती महत्त्वपूर्ण - जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे

Image
  शासकीय योजना तयार करण्यासाठी अर्थ व सांख्यिकी संचालनालयाची माहिती महत्त्वपूर्ण - जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे अमरावती, दि. 29 : शाश्वत विकासासाठी निश्चित केलेली ध्येये साध्य करतांना केवळ उद्दिष्टपूर्तीवर भर न देता गुणवत्तेला अधिक महत्त्व द्यावे. राज्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या योजनांचा मुख्य स्त्रोत म्हणून अर्थ व सांख्यिकी संचालनालयाची माहिती महत्त्वपूर्ण असल्याचे मत जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे यांनी आज येथे व्यक्त केले. नियोजन भवन येथे भारतीय संख्याशास्त्राचे जनक प्रा. महालनोबिस यांच्या जयंतीनिमित्त सोळावा सांख्यिकी दिवस साजरा करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सांख्यिकी शास्त्रज्ञ प्रा. प्रशांतचंद्र महालनोबिस यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. श्रीमती भाकरे म्हणाल्या की, भारतीय संख्याशास्त्राचे जनक सांख्यिकी शास्त्रज्ञ प्रशांतचंद्र महालनोबिस यांचे संख्याशास्त्राच्या विकासातील योगदान महत्त्वाचे आहे. यावर्षीचे घोषवाक्य ‘शाश्वत विकासासाठी सांख्यिकी’ हे आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने शाश्वत विकासाची

जिल्हा लोकशाही दिन 4 जुलैला

जिल्हा लोकशाही दिन 4 जुलैला   अमरावती, दि.29: जिल्हा लोकशाही दिन महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार जुलै महिन्यातील जिल्हा लोकशाही दिन, सोमवार, दिनांक 4 जुलै 2022 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. संबंधितांनी याची नोंद घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी   यांनी केले आहे.

शाळेच्या पहिल्या दिवशी उत्साहात प्रवेशोत्सव हिंगणगांव निवासी शाळेतील विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते स्वागत

Image
  शाळेच्या पहिल्या दिवशी उत्साहात प्रवेशोत्सव हिंगणगांव निवासी शाळेतील विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते स्वागत   अमरावती, दि.29: हिंगणगांव येथील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळेत 27 जून रोजी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या उपस्थितीत विद्यार्थी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. समाज कल्याण सहायक आयुक्त माया केदार, विशेष अधिकारी राजेंद्र भेलाऊ, मुख्याध्यापिका शीतल तिरपुडे आदी यावेळी उपस्थित होते. समाजकल्याण आयुक्त यांनी सन 2022-23 या शैक्षणिक सत्रात राज्यातील प्रत्येक निवासी शाळेमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी प्रवेशोत्सव साजरा करण्याबाबत सूचना दिली होती. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द मुला-मुलींच्या शासकीय निवासी शाळेत 27 जून या एकाच दिवशी जिल्ह्यातील सातही शाळेत विद्यार्थी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी यांनी यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना पुष्प देवून त्यांचे स्वागत केले. त्यांनी सर्व प्रवेशितांसोबत संवाद साधला. स्वतःचा शैक्षणिक पुर्वानुभव व जिल्हाधिकारी   पदापर्यंतचा प्रवासाबाबत विद्यार्थ्यांना माहिती देवून प्रश

बियाण्याची उगवण न झालेल्या शेतीक्षेत्राचे पंचनामे करण्याचे निर्देश बोगस बियाणे विकणा-यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Image
  बियाण्याची उगवण न झालेल्या शेतीक्षेत्राचे पंचनामे करण्याचे निर्देश बोगस बियाणे विकणा-यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा -     पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर   अमरावती, दि. 28 : बियाण्याची उगवण न झाल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेबाबत तडजोड अजिबात खपवून घेतली जाणार नाही. बोगस बियाणे विकणा-या कंपन्या व विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. त्याचप्रमाणे, उगवण न झालेल्या शेतीक्षेत्राचे पंचनामे करण्यात यावेत, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत.     जिल्ह्यात बोगस बियाणे विकणे, बियाण्याची उगवण न होणे आदी तक्रारींची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. तिवसा तालुक्यात ‘विक्रांत ’ या व्हेरायटीचे सोयाबीन बियाणे पेरल्यानंतर उगवण न झाल्याची तक्रार शेतकरी बांधवांनी केली आहे. या क्षेत्राचे तत्काळ पंचनामे करून घ्यावेत. प्रत्येक शेतकरी बांधवाशी संवाद साधून माहिती जाणून घ्यावी. त्याचप्रमाणे, बोगस बियाणे विकणा-यांवर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्

खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

  खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन               अमरावती, दि.28: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना संपूर्ण राज्यात कार्यान्वित करण्यात आली   आहे. मध केंद्र योजनेमध्ये   मध उद्योगासाठी   मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणुक, शासनाची हमी भावाने मधखरेदी, विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षक व संवर्धनाची जनजागृती याबाबत सहाय्य   करण्यात येणार आहे.   वैयक्तिक मधपाळ मध केंद्र योजनेनुसार वैयक्तिक मधपाळ अर्जदार हा साक्षर असावा. तसेच त्याचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे.   स्वत:ची शेती असल्यास त्या अर्जदारास प्राधान्य देण्यात येईल.   केंद्रचालक प्रगतीशील मधपाळ   केंद्रचालक प्रगतीशील मधपाळ व्यक्ती किमान दहावी उत्तीर्ण असावा. त्याचे वय 21 वर्षापेक्षा जास्त    असावे. अशा व्यक्तीच्या नावे किमान एकर जमीन अथवा त्या व्यक्तींच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान एक एकर शेत-जमीन किंवा भाडे तत्त्वावर घेतलेली शेत जमीन असावी. केंद्रचालक प्रगतीशील मधपाळाकडे मधमाशापालन,

शेतक-यांना ६ टक्के दराने कर्ज मिळण्यासाठी शासनाचे अर्थसाह्य जिल्ह्यात पीक कर्जवितरणाला गती द्यावी - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Image
  शेतक-यांना ६ टक्के दराने कर्ज मिळण्यासाठी शासनाचे अर्थसाह्य जिल्ह्यात पीक कर्जवितरणाला गती द्यावी - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर   अमरावती, दि. २८ : शासनाने राज्यातील शेतक-यांना ६ टक्के व्याजदराने अल्पमुदत पीक कर्जपुरवठा होण्यासाठी शासकीय अर्थसहाय्याचा निर्णय घेतला असून, तसा शासन निर्णय निर्गमित झाला आहे. त्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करतानाच जिल्ह्यात पीक कर्जवितरणाला गती द्यावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत.   यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात कर्जपुरवठ्याचे 1 हजार 400 कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत खरीपाचे 66.67 टक्के कर्जवितरण झाले असून, संपूर्ण उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वितरणाची प्रक्रिया गतीने होणे आवश्यक आहे.   कर्जपुरवठ्याची प्रक्रिया राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांकडून संथगतीने होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. राष्ट्रीयकृत व खासगी बँकांची कर्जवितरणाची टक्केवारी कमी असून, ती वाढविण्यासाठी मोहिम स्तरावर काम करावे. जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी बांधव कर्ज मिळण्यापा

कृषी निविष्ठा विक्रीत गैरव्यवहार आढळल्यास भरारी पथकाकडे तक्रार करा - जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान

  कृषी निविष्ठा विक्रीत गैरव्यवहार आढळल्यास   भरारी पथकाकडे तक्रार करा -           जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान अमरावती ,   दि. 27:   कृषी निविष्ठा विक्रीत गैरव्यवहार रोखण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर भरारी पथके निर्माण करण्यात आली असून, तसे आढळल्यास भरारी पथकाला तत्काळ , संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान यांनी केले आहे.           जादा दराने विक्री, मुदतबाह्य मालाची विक्री, साठेबाजी, अनधिकृत निविष्ठांची विक्री अशा तक्रारींचे निराकरण करण्यासाठी भरारी पथक व तक्रार निवारण कक्ष स्थापण्यात आला आहे. जिल्हास्तरीय तक्रार निवारण कक्षाचा भ्रमणध्वनी क्र. 9325962775 आणि कृषी विभागाचा टोल फ्री क्रमांक 1800-233-4000 असा आहे. या क्रमांकावर संपर्क साधा कृषी विभागाने पथकांचे संपर्क क्रमांकही जाहीर केले आहेत. त्यावरही तक्रार करता येईल. त्यानुसार   जिल्हा   गुणनियंत्रण   अधिकारी दादा सो   पवार   यांचा   भ्रमणध्वनी क्रमांक   8975815204, तर   कृ षी   विकास अधिकारी जी. टी. देशमुख   यांचा   भ्रमणध्वनी क्र . 9422855587 असा आहे.    जिल्हा कृषि अधिकारी   अ