शाळेच्या पहिल्या दिवशी उत्साहात प्रवेशोत्सव हिंगणगांव निवासी शाळेतील विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते स्वागत

 



शाळेच्या पहिल्या दिवशी उत्साहात प्रवेशोत्सव

हिंगणगांव निवासी शाळेतील विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते स्वागत

 

अमरावती, दि.29: हिंगणगांव येथील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळेत 27 जून रोजी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या उपस्थितीत विद्यार्थी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. समाज कल्याण सहायक आयुक्त माया केदार, विशेष अधिकारी राजेंद्र भेलाऊ, मुख्याध्यापिका शीतल तिरपुडे आदी यावेळी उपस्थित होते.

समाजकल्याण आयुक्त यांनी सन 2022-23 या शैक्षणिक सत्रात राज्यातील प्रत्येक निवासी शाळेमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी प्रवेशोत्सव साजरा करण्याबाबत सूचना दिली होती. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द मुला-मुलींच्या शासकीय निवासी शाळेत 27 जून या एकाच दिवशी जिल्ह्यातील सातही शाळेत विद्यार्थी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.

जिल्हाधिकारी यांनी यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना पुष्प देवून त्यांचे स्वागत केले. त्यांनी सर्व प्रवेशितांसोबत संवाद साधला. स्वतःचा शैक्षणिक पुर्वानुभव व जिल्हाधिकारी  पदापर्यंतचा प्रवासाबाबत विद्यार्थ्यांना माहिती देवून प्रशासकीय  सेवांविषयी मार्गदर्शन केले. सामाजिक न्याय विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयींसाठी दालन उपलब्ध करुन दिले आहे. त्याचा उपयोग घेवून चांगला अभ्यास करा व आपण निवडलेल्या क्षेत्रात यशस्वी व्हा. विद्यार्थीदशेत आपण नेहमी मोठे स्वप्न पाहावे व ते साकार करण्यासाठी जिद्द व चिकाटी कायम ठेवून आपले स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

श्रीमती कौर यांनी यावेळी निवासी शाळेच्या इमारतीची पाहणी केली. त्यांच्या संकल्पनेतून अनुसूचित जाती उपयोजनेच्या नाविण्यपूर्ण योजनेतून सर्व निवासी शाळांना देण्यात आलेल्या नाविण्यपूर्ण विज्ञानकेंद्राची पाहणी करुन या केंद्राचे उदघाटन केले. प्रवेशितांच्या वर्गखोल्या, निवास व्यवस्था, ग्रंथालय, प्रयोगशाळा यांची पाहणी करुन माहिती जाणून घेतली. या विज्ञान केंद्राचा उपयोग शाळेतील सर्व प्रवेशितांना करुन देण्यात यावा तसेच शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वृध्दींगत व्हावा यासाठी प्रयत्नशील रहावे. विज्ञान केंद्राचा उपयोग तालुक्यातील इतरही शाळांतील विद्यार्थ्यांना होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,नागरिक, पालक, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती