Monday, June 13, 2022

कृषी विभागाच्या कार्यशाळेत विविध विषयांवर मार्गदर्शन

 




कृषी विभागाच्या कार्यशाळेत विविध विषयांवर मार्गदर्शन

 

अमरावती, दि. 13 : कृषी विभागातर्फे प्रेमकिशोर सिकची शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या सहकार्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात बीबीएफ पद्धतीने पेरणी मार्गदर्शन कार्यशाळा, तसेच भाडे तत्वावर कृषी अवजारे  सेवा केंद्र  यांचे ट्रॅक्टरचालक व  संचालक, प्रतिनिधींचे प्रशिक्षण वलगाव येथे सिकची रिसॉर्टमध्ये नुकतेच झाले. त्याला शेतकरी बांधवांनी मोठा प्रतिसाद दिला.

 

यावेळी उत्पादक कंपनी,शेतकरी  गट, महिला बचत गटाच्या सदस्यांनाही प्रात्यक्षिकद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. विभागीय कृषी सहसंचालक के. एस.मुळे, जिल्हा कृषी अधिकारी निल खर्चान, आत्मा प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने, कृषी तज्ज्ञ डॉ.के.पी सिंग, डॉ. आर.एस राठोड आदी उपस्थित होते.

 

 खारपाणपट्ट्यातील शेतकर्‍यांना उत्पादनवाढीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करून भविष्यकाळातील अडचणीवर मात करता येईल, असा विश्वास कृषी सहसंचालन श्री. मुळे यांनी व्यक्त केला. यावेळी ‘पोरा’तील विविध योजना, तसेच बीबीएफ तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना होणारे फायदे याबाबत श्रीमती निस्ताने यांनी माहिती दिली. कृषी विभागामार्फत विविध योजनांची माहिती श्री. खर्चान यांनी दिली. येत्या खरीप हंगामामध्ये पिकाचे नियोजन करताना आवश्यक उपाययोजनांबाबत डॉ. सिंग यांनी सांगितले. बीबीएफ तंत्रज्ञानाचे महत्व डॉ. राठोड यांनी सचित्र सादरीकरणातून सांगितले.

 

कृषी उद्योजक  बीबीएफ यंत्राचे उत्पादक निखिल जळमकर यांनी यंत्राचा उपयोग व काळजी याची माहिती दिली. सचिन माळकर यांनी शेतकरी उत्पादक कंपनीचे विविध उपक्रम विद केले.

 

वलगावच्या सरपंच मोहिनीताई मोहोड, उपविभागीय कृषी अधिकारी माणिक त्र्यंबके, गजानन कडू, मनोज जयस्वाल, राजूभाऊ जोशी, मनोज निर्मळ, नितीन मुळे आदी उपस्थित होतो.

 

00000

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...