Tuesday, June 7, 2022

सौर कृषी पंपासाठी लाभार्थी हिस्सा भरण्याची मुदतवाढ 30 जुनपर्यंत

 

https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana Componenet-B

सौर कृषी पंपासाठी लाभार्थी हिस्सा भरण्याची मुदतवाढ 30 जुनपर्यंत

 अमरावती, दि.7: महाकृषी अभियानात प्रधानमंत्री कुसूम घटक-ब योजनेत शेतकरी  बांधवांना सौर कृषी पंप वितरित होतात. त्यात लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी सुधारित अंतिम मुदत दि. 30 जुन, 2022 पर्यंत वाढविण्यात आली असून, अर्जदारांनी मुदतीत लाभार्थी हिस्सा जमा करावा, असे  आवाहन ‘महाऊर्जा’चे विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल व. तायडे यांनी केले आहे.

सौर  पंप  मिळण्यासाठी महाऊर्जाच्या ई-पोर्टलवर अर्ज प्राप्त झालेल्या अर्जदारांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी  मोबाईल संदेशाद्वारे कळविण्यात आले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी ऑनलाईन किंवा एनईएफटीव्दारे लाभार्थी हिस्सा भरावयाचा असल्यास पोर्टलवर एनईएफटी प्रत बँकेच्या शिक्का आदी तपशीलासह अपलोड करावी व मूळ प्रत ‘महाऊर्जाच्या कार्यालयास भेट देऊन जमा करावी, असे आवाहन श्री. तायडे यांनी केले.  

 

अडचणी येत असतील तर संपर्क साधा

 

शेतकरी बांधवांना ई-पोर्टलवर अर्ज करण्यास, लाभार्थी हिस्सा भरण्यास व इतर अंमलबजावणी संदर्भात येत अडचणी असल्यास महाऊर्जाच्या संकेतस्थळाव (www.mahaurja.com) किंवा अमरावतीतील विभागीय कार्यालय तसेच जिल्हा कार्यालय यवतमाळ व अकोला यांच्या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत सकाळी 9:45 ते सायंकाळी 6:15 वा. पर्यंत संपर्क साधावा.

000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...