Thursday, June 16, 2022

सामाजिक न्याय विभागाच्या 24 वसतिगृहांत प्रवेश प्रक्रिया सुरू

 

 

सामाजिक न्याय विभागाच्या 24 वसतिगृहांत प्रवेश प्रक्रिया सुरू

 

            अमरावती, दि. 15 : जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागातर्फे जिल्हास्तर व तालुका स्तरावर मुलींची  13 व मुलांची 11 अशी 24 वसतिगृहे आहेत. त्यात 2022-23  या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

 

शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची प्रक्रिया जिल्ह्यातील सर्व तालुकास्तर वसतिगृहांमध्ये सुरू आहे. कनिष्ठ महाविद्यालय प्रवेश 10 वीच्या निकालानंतर 15 दिवसांपर्यंत आणि वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश 12 वीच्या निकालानंतर 15 दिवसांपर्यंत, तसेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे प्रवेश पदवी अभ्यासक्रमाच्या निकालानंतर 15 दिवसांपर्यंत सुरू राहतील.

 

            वसतिगृहांत शासनाचा निकषांनुसार सोयी-सुविधा मिळतात. शासनाने निश्चित केलेल्या टक्केवारीनुसार, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, आर्थिक मागासवर्गीय व विमाप्र विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे प्रवेश दिला जातो.              विभागीय स्तरावर म्हणजेच अमरावती मुख्यालयाच्या वसतिगृहामध्ये केवळ कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय व व्यावसायिक महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनाच गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतो.

 

इच्छूक विद्यार्थ्यांनी संबंधित वसतिगृहाचे गृहप्रमुख किंवा गृहपाल यांच्याशी संपर्क साधावा. तिथे अर्ज उपलब्ध असतात. ते मिळवून कागदपत्रांसह वसतिगृह प्रमुखांकडे सादर करावेत. अधिक माहितीसाठी समाजकल्याण कार्यालयाच्या 0721-2661261 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन सहाय्यक समाजकल्याण आयुक्त माया केदार यांनी केले आहे.

 

00000

 

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 11-03-2026

  दिव्यांग लाभार्थ्यांच्या मानधनात हजार रुपयांची वाढ; 20 मार्चपूर्वी युडीआयडी आणि आधार अपडेट करण्याचे आवाहन अमरावती, दि. 11 (जिमाका):   राज्...