Wednesday, June 8, 2022

क्रेडिट आऊटरिच कॅम्प’द्वारे 56 कोटी रूपयांचे कर्जवितरण

 






आझादी का अमृत महोत्सव

 क्रेडिट आऊटरिच कॅम्पद्वारे 56 कोटी रूपयांचे कर्जवितरण

 

  

अमरावती, दि. 6 : ‘आयकॉनिक वीकअंतर्गत विविध योजनांचे लाभार्थी व ग्राहकांना मिळणा-या सेवेची परिणामकारता वाढविण्यासाठी आर्थिक संस्था व बँकांच्या सहभागातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यात लीड बँकेतर्फे नियोजनभवनात आज झालेल्या ‘क्रेडिट आऊटरिच कॅम्प’मध्ये 56 कोटी रूपयांहून अधिक रकमेचे कर्जवितरण करण्यात आले.

जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. सेंट्रल बँकेचे विभागीय प्रमुख जी. एल. नरवाल, लीड बँकेचे व्यवस्थापक जितेंद्रकुमार झा, बँक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय प्रमुख जीवन पाटील, बँक ऑफ बडोदाच्या विभागीय प्रमुख नंदिनी गायकवाड, स्टेट बँक ऑफ इंडियाचे श्रीरंग कुलकर्णी, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक राजेंद्र रहाटे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सुनील सोसे यांच्यासह बँकांचे व्यवस्थापक उपस्थित होते.

 

आर्थिक सेवांप्रति लाभार्थी, ग्राहक यांचा विश्वास वाढविणे, सेवेची परिणामकारता वाढविणे यासाठी कार्यक्रम घेण्यात येत आहेत. त्याचअनुषंगाने शिबिर घेण्यात आले. शिबिरात 3 हजार 676 व्यक्तींना 56 कोटी 86 लाख रूपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. 

 

अटल पेंशन योजना, जीवन ज्योती, जीवन विमा, सुकन्या समृद्धी योजना यासह विविध फ्लॅगशिप प्रोग्राम व योजनांच्या लाभाचे प्रत्यक्ष वितरण, तसेच गुणवंत अधिकारी व कर्मचा-यांचा गौरव यावेळी  करण्यात आला.  

 000

 

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...