Posts

Showing posts from October, 2023

नव भारत साक्षरता कार्यक्रम यशस्वीपणे राबवा - मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा

Image
  नव भारत साक्षरता कार्यक्रम यशस्वीपणे राबवा - मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा अमरावती, दि. 31 (जिमाका) :  नव भारत साक्षरता कार्यक्रम जिल्ह्यामध्ये यशस्वीपणे राबविण्यासाठी यंत्रणांनी पुढाकार घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज केले. नव भारत साक्षरता कार्यक्रम 2022-2027 अंतर्गत गठित नियामक परिषद समिती व कार्यकारी समितीची दुसरी बैठक आज श्री. अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कक्षामध्ये आयोजित करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.             नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या बैठकीमध्ये शिक्षणाधिकारी (योजना) सय्यद राजीक सय्यद गफ्फार यांनी प्रारंभी माहिती दिली. मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे, जिल्हा व्यवसाय व कौशल्य विकास अधिकारी प्रांजली बारस्कर, डायट प्रतिनिधी विजय शिंदे, शासकीय तंत्रनिकेतनचे प्रभारी प्राचार्य एन.जी. देशमुख, जिल्हा सांख्यिकी अधिकारी संजय काळमेघ, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती आर.एस. राऊत, प्र. जिल्हा माहिती अधिकारी अपर्णा यावलकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बुध्दभुषण सोनोने, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) अनिल कोल्

भ्रष्टाचारासंबंधी तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन

  भ्रष्टाचारासंबंधी तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन • दक्षता जनजागृती सप्ताह 5 नोव्हेंबरपर्यंत             अमरावती, दि. 31 : राज्यात दरवर्षी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा दि. 31 ऑक्टोबर या जन्म दिवसानिमित्त एक आठवडा ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’चे करण्यात येते.   यंदाही दि. 30 ऑक्टोबर 2023 ते 5 नोव्हेंबर 2023 या कालावधीत ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहासाठी यावर्षी ‘भ्रष्टाचाराला नाही म्हणा; राष्ट्रासाठी वचनबध्द व्हा’   ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती कार्यालय येथे नुकतीच भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ घेवून दक्षता जनजागृती सप्ताह 2023 ची सुरूवात करण्यात आली. राज्यपाल रमेश बैस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सप्ताहानिमित्त दिलेला संदेश उपस्थितांना यावेळी वाचून दाखविण्यात आला.            या कार्याक्रमास पोलीस अधिक्षक   मारूती जगताप, अपर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे, पोलीस उपअधीक्षक मिलिंदकुमार बहाकर   यांच्यासह सर्व अधिकारी, अंमलदार उपस्थित होते. दक्षता जनजा

वनविभाग व संत गाडगेबाबा संस्थेचा स्तुत्य उपक्रम निसर्गाच्या माहितीवर आधारित परीक्षेत 200 विद्यार्थ्यांचा सहभाग

Image
  वनविभाग व संत गाडगेबाबा संस्थेचा स्तुत्य उपक्रम निसर्गाच्या माहितीवर आधारित परीक्षेत 200 विद्यार्थ्यांचा सहभाग   अमरावती, दि. 31(जिमाका): अमरावती येथील ऑक्सीजन पार्कमध्ये संत गाडगेबाबा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी वन्यप्राणी, पक्षी व जंगलाचे ज्ञान होण्याच्या दृष्टीने नुकतीच स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी ऑक्सीजन पार्कमध्ये लावलेल्या वन्यप्राणी पक्षांच्या माहितीच्या फलकाचा अभ्यास केला. या स्पर्धा परीक्षेत जवळपास 200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेचा निकाल जाहीर केल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षिस व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटक पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संत गाडगेबाबा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर ठाकरे व त्यांच्या चमूचे अभिनंदन केले. मनपा आयुक्त देविदास पवार यांनी या उपक्रमासाठी संस्थेला जी मदत लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच हा नाविण्यपूर्ण उपक्रम संत गाडगेबाबा संस्था व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्य

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची सुवर्ण संधी

  भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची सुवर्ण संधी     अमरावती (जिमाका),दि. 31 : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील नवयुवक व नवयुवतीसाठी दि. 20 ते 29 नोव्हेंबर, 2023 या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. 55 आयोजित करण्यात आले आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क व्यवस्था करण्यात आली आहे.   अमरावती जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अमरावती येथे दि. 15 नोव्हेंबर, 2023 मुलाखतीस हजर रहावेत. मुलाखतीस येतेवेळी Department of Sainik Welfare, Pune (DSW) या वेबसाईट वर सर्च करुन त्यामधील एसएसबी-55 कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे.  

जिल्हा कोषागार कार्यालय येथे भूमीपूजन सोहळा

  जिल्हा कोषागार कार्यालय येथे आज भूमीपूजन सोहळा           अमरावती, दि. 31 (जिमाका) : जिल्हा कोषागार कार्यालय येथे जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत प्राप्त निधीतून जिल्हा कोषागार कार्यालय, अमरावती येथील सभागृह बांधकामाचा भूमीपूजन सोहळा कार्यक्रम उद्या बुधवार, दि. 1 नोव्हेंबर 2023 रोजी संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते होणार आहे. तसेच पोलीस अधीक्षक ग्रामीण अविनाश बारगळ, सहसंचालक स्थानिक निधी लेखा विभाग विनोद गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अमरावती विभाग लेखा व कोषागारे सहसंचालक श्रीमती प्रिया तेलकुंटे राहतील. 00000

प्रारुप मतदार यादी प्रकाशित करुन विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाला प्रारंभ

Image
  येत्या निवडणुकीमध्ये मताधिकार बजावण्यासाठी नवमतदारांनी नाव नोंदणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन प्रारुप मतदार यादी प्रकाशित करुन विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाला प्रारंभ जिल्ह्यात 2 हजार 664 मतदार केंद्रे               अमरावती, दि. 27 (जिमाका): लोकशाही सक्षमीकरणाची पहिली पायरी मतदार नोंदणी करून आपला मताधिकार बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे. निवडणूका पारदर्शक आणि न्याय वातारणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्यावतीकरण, शुध्दीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविल्या जातो. आज दि. 27 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघामध्ये मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयांमध्ये आणि सर्व मतदान केंद्रावर प्रारूप मतदार यादी प्रकाशित करून यंदाचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. हा कार्यक्रम आज दि. 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीत राबविला जाणार आहे.             दि. 1 जानेवारी 2024 रोजी किंवा त्या आधी वयाची 18 वर्षे पूर्ण झालेले नागरिक

‘उर्ध्व वर्धा’तून रब्बी सिंचनासाठी पाच पाणीपाळ्या प्रस्तावित शेतक-यांना अर्ज करण्याचे आवाहन

  ‘उर्ध्व वर्धा’तून रब्बी सिंचनासाठी पाच पाणीपाळ्या प्रस्तावित शेतक-यांना अर्ज करण्याचे आवाहन अमरावती, दि. 27(जिमाका): उर्ध्व वर्धा प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी  पाणीसाठा उपलब्ध असून पाच पाणी पाळ्या देण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी लाभक्षेत्रातील शेतकरी बांधवांनी 10 नोव्हेंबरपूर्वी संबंधित शाखा कार्यालयास अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उजवा मुख्य कालव्याच्या आरंभापासून  95.50 किमीपर्यंत व डावा मुख्य कालव्याच्या  42.40 किमीपर्यंतच्या लाभक्षेत्रातील सर्व वितरिका, जलाशयावरील अधिसूचित नदीनाल्यांवरील लाभधारकांना रब्बी हंगामासाठी  पाणी देण्यात येईल. वितरण व्यवस्थेद्वारे जिथे सुलभपणे पाणी जाऊ शकते तिथपर्यंत कालवा संचलन कार्यक्रमानुसार  ‘पुच्छ भागाकडून ते मुखाकडे’ (टेल टु हेड) या तत्त्वानुसार सिंचन होणे आवश्यक आहे. नोव्हेंबर ते मार्च दरम्यान पाच वेळा पाणी मिळेल कालव्याचे प्रवाही किंवा कालव्यावरील, नदी-नाल्यांवरील मंजूर उपसा सिंचन योजनांद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यावयाचे असल्यास पाणी मागणी अर्ज नमुना क्र. 7 संबंधित शाखा कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. ते भरून 10  नोव्हेंबरपर्यंत तिथेच सादर

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेमध्ये कारागिरांनी नोंदणी करावी - जिल्हाधिकारी सौरभ कटियार

Image
  प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेमध्ये    कारागिरांनी नोंदणी करावी - जिल्हाधिकारी सौरभ कटियार   अमरावती, दि. 25 (जिमाका):   औजारे व साधने यांचा वापर करुन तसेच हातांनी काम करणाऱ्या पारंपारीक कारागिर आणि हस्तकलेच्या वस्तूंची निर्मिती करणाऱ्यांना ओळख प्राप्त करुन देण्यासाठी आणि त्यांना सर्वांगिण आधार देऊन त्यांचा विकास करण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना मंजूर केली आहे. या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत-जास्त पारंपारीक कारागिरांना लाभ होण्यासाठी तसेच लाभार्थी कारागिरांपर्यंत या योजनेची माहिती पोहचविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या जिल्हा अंमलबजावणी समितीच्या सभेत नुकतेच दिले.             अमरावती जिल्ह्यात या योजनेंतर्गत आज अखेर 1 हजार 581 ग्रामीण कारागिरांची नोंदणी झालेली आहे. ती वाढविण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत स्तरापर्यंत या योजनेबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येईल अशी सूचना श्री. कटियार यांनी यावेळी दिली.             जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अध

मेरी माटी, मेरा देश उपक्रमांतर्गत अमृत कलश मान्यवरांच्या उपस्थितीत आज मुंबईला रवाना

Image
  मेरी माटी, मेरा देश उपक्रमांतर्गत अमृत कलश मान्यवरांच्या उपस्थितीत आज मुंबईला रवाना   अमरावती, दि. 25 (जिमाका): स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांच्या समारोपीय उपक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानांतर्गत 'अमृत कलश यात्रा ' उपक्रम अमरावती जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात आला. यामध्ये जिल्ह्यातील प्रत्येक गावातून संकलित करण्यात आलेल्या 14 तालुक्यातील मातीचे 14 माती कलश मुख्यालयाच्या ठिकाणी एकत्रित करुन मुंबई व तेथून दिल्लीला पाठविण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.              दि. 1 सप्टेंबर पासून जिल्ह्यात ‘माझी माती, माझा देश’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील 841 ग्रामपंचायत मधील 1 हजार 566 गावांमधून माती गोळा करुन तालुकास्तरावर माती कलश तयार करण्यात आले. सर्व 14 तालुक्याचे ठिकाणी वाजत-गाजत अमृत कलश यात्रा काढण्यात आली.             तालुक्यावर संकलित करण्यात आलेल्या मातीचे अमृत कलश मुंबईला होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी पाठविण्यासाठी आज जिल्हा परिषद प्रांगणात जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आ

कृषी उद्योजकता निर्मिती व एमपीसी क्षमता विकास कार्यशाळा 27 ऑक्टोबर रोजी

  कृषी उद्योजकता निर्मिती व एमपीसी क्षमता विकास कार्यशाळा 27 ऑक्टोबर रोजी        अमरावती, दि. 25 (जिमाका) : महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा), कृषी विद्या विभाग-श्री. शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती व कृषी भूषण महाराष्ट्र एफपीओ स्टार्टअप फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांना व्यवसायात यशस्वी होण्यासाठी ‘कृषी उद्योजकता निर्मिती व एमपीसी क्षमता विकास कार्यशाळा-ॲग्री स्टार्ट-अप कनवेंशन’ डॉ. पंजाबराव देशमुख कृषक प्रशिक्षण केंद्र, श्री. शिवाजी कृषी विद्यान महाविद्यालय, मोर्शी रोड, अमरावती येथे दि. 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.30 वाजता आयोजित करण्यात आलेले आहे.             या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते होणार असून विभागीय कृषी सहसंचालक किसनजी मुळे, कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. या कार्यशाळेला प्राचार्य श्री शिवाजी कृषी महाविद्यालय नंदकिशोर चिखले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, प्रकल्प संचालक (आत्मा) अर्चना निस्ताने  उपस्थित राहणार आहेत. कार्यशाळेसाठी चेअरमन-कृषी भूषण महाराष्ट्र एफपीओ

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यास महाडीबीटी संकेतस्थळ कार्यान्वित

  अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यास महाडीबीटी संकेतस्थळ कार्यान्वित             अमरावती, दि. 25 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या वरील विविध शिष्यवृत्ती योजनांचे सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्षाचे व नुतनीकरणाचे अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी दि. 11 ऑक्टोबर, 2023 पासून महाडीबीटी पोर्टल शासनाकडून सुरू करण्यात आलेले आहे.             सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून शासनाच्या महाडीबीटी प्रणालीवर विविध शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात. भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परिक्षा फी प्रदाने, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन, व व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना तसेच सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी स्तरावर असलेले अर्ज विद्यार्थ्यांना रि-अप्लाय

अमृत कलश यात्रेच्या माध्यमातून विविधतेतून एकात्मतेचा संदेश - जिल्हाधिकारी सौरभ कटियार

Image
  जिल्हास्तरीय अमृत कलश यात्रा अमृत कलश यात्रेच्या माध्यमातून विविधतेतून एकात्मतेचा संदेश - जिल्हाधिकारी सौरभ कटियार अमरावती, दि. 23 (जिमाका):  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमातील देशभक्तीपर भावनेची अनुभूती आपण सर्वजण अनुभवत आहोत. अमृत कलश यात्रेच्या माध्यमातून विविधतेतून एकात्मतेचा संदेश दिला जात आहे. देशाच्या स्वातंत्र्याला जेव्हा शंभर वर्षे पूर्ण होतील त्यावेळी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमामध्ये तुमचे योगदान होते, याचा तुम्हाला अभियान राहील. गावा-गावात शूरवीरांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ शीलाफलक स्थापन करण्यात आले आहे. येणाऱ्या पिढीला हे शीलाफलक शौर्य, त्याग, बलिदान यांचे प्रतीक म्हणून देशसेवा करण्यासाठी प्रेरित करीत राहील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे केले. नगरपालिका प्रशासन विभागामार्फत ‘माझी माती, माझा देश’ (मिट्टी को नमन, विरों को वंदन) याअंतर्गत जिल्हास्तरीय ‘अमृत कलश यात्रे’चे आयोजन आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये जिल्हाधिकारी श्री. कटियार यांच्या मुख्य उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते

मेरी माटी, मेरा देश उपक्रमांतर्गत अमृत कलश मान्यवरांच्या उपस्थितीत आज मुंबईला रवाना

Image
                                                      मेरी माटी, मेरा देश उपक्रमांतर्गत अमृत कलश मान्यवरांच्या उपस्थितीत आज मुंबईला रवाना अमरावती, दि. 25 (जिमाका):  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांच्या समारोपीय उपक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानांतर्गत 'अमृत कलश यात्रा ' उपक्रम अमरावती जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात आला. यामध्ये जिल्ह्यातील प्रत्येक गावातून संकलित करण्यात आलेल्या 14 तालुक्यातील मातीचे 14 माती कलश मुख्यालयाच्या ठिकाणी एकत्रित करुन मुंबई व तेथून दिल्लीला पाठविण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.             दि. 1 सप्टेंबर पासून जिल्ह्यात ‘माझी माती, माझा देश’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील 841 ग्रामपंचायत मधील 1 हजार 566 गावांमधून माती गोळा करुन तालुकास्तरावर माती कलश तयार करण्यात आले. सर्व 14 तालुक्याचे ठिकाणी वाजत-गाजत अमृत कलश यात्रा काढण्यात आली.             तालुक्यावर संकलित करण्यात आलेल्या मातीचे अमृत कलश मुंबईला होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी पाठविण्यासाठी आज जिल्हा परि