Friday, October 13, 2023

मानवी तस्करी विरोधी जनजागृती रॅलीला मान्यवरांनी दाखविली हिरवी झेंडी

 










मानवी तस्करी विरोधी जनजागृती रॅलीला मान्यवरांनी दाखविली हिरवी झेंडी

              अमरावती, दि. 14(जिमाका) : मानवी तस्करी विरोधी जनजागृतीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, दि. मुव्हमेंट इंडिया व रुरल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज पदयात्राद्वारे जनजागृती करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.

नेहरु मैदान येथून आज सकाळी रॅली सुरु झाली. यामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिकारी, स्थानिक विविध सामाजिक संघटना व विविध शैक्षणिक संस्थांचे प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने सहभाग घेतला. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जी.आर.पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, पोलिस निरिक्षक श्रीमती रिता उईके, युवा रुरल संस्थाचे कार्यक्रम समन्वयक जिंतेद्र देशमुख, समाजसेविका रजिया सुलताना, डॉ. अनुभूती पाटील आदी उपस्थित होते.

ही रॅली राजकमल चौक, जयस्तंभ चौक, मालविय चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. या रॅलीमध्ये समाजकार्य महाविद्यालय बडनेरा, डॉ. पंजाराव देशमुख विधी महाविद्यालय, भारतीय महाविद्यालय, शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालय, मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय, मानव संवाद केंद्र, स्त्री संवेदना संस्था, युवा रुरल संस्था, दि. मुव्हमेंट इंडिया आदी संघटनेनी सहभाग घेऊन मानवी तस्करी विरोधी बॅनर, घोषणाव्दारे जनजागृतीपर संदेश देण्यात आले. समारोपीय कार्यक्रमापुर्वी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण अभिवादन करण्यात आले.

श्री. पाटील म्हणाले की, भारतीय संविधानात नागरिकांच्या रक्षणासाठी मुलभुत अधिकारी दिले आहे. त्याला कायद्याचे संरक्षण असून आपल्याला दिलेले अधिकार व कायद्याचे ज्ञान प्रत्येकांना असणे आवश्यक आहे. सोशल मिडीयाव्दारे मानवी तस्करी व अन्य घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यासाठी प्रत्येकांनी जागरुक असणे आवश्यक आहे. मानवी तस्करीत बळी पडलेल्यांना वाचविण्यासाठी तसेच तस्करी विरुद्ध लढा देण्यासाठी प्रत्येकांने सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी केले. त्यानंतर  इतर मान्यवरांनीही मानवी तस्करी रोखण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिवाकर देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन  पल्लवी वैद्य यांनी तर आभार सुचिता बर्वे यांनी मानले.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...