‘महिला आयोग आपल्या दारी’ अंतर्गत जनसुनावणीमध्ये 95 तक्रारी प्राप्त सुनावणीत दांम्पत्याचे मनोमिलन

 





‘महिला आयोग आपल्या दारी’ अंतर्गत जनसुनावणीमध्ये 95 तक्रारी प्राप्त

सुनावणीत दांम्पत्याचे मनोमिलन

 

            अमरावती, दि. 10 (जिमाका): महाराष्ट्र राज्य महिला आयोगामार्फत ‘महिला आयोग आपल्या दारी’ अंतर्गत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आज जनसुनावणी घेण्यात आली. यावेळी 95 तक्रारी सुनावणीसाठी प्राप्त झाल्या. प्राप्त तक्रारींचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागाकडे तक्रारी वर्ग करण्यात आल्या असून या तक्रारी तातडीने निकाली काढण्याचे निर्देश श्रीमती चाकणकर यांनी यावेळी दिले.

सुनावणी दरम्यान दहा वर्षापासून कौटुंबिक वितुष्ट असणारे दांम्पत्य आले होते. या सुनावणी दरम्यान त्यांचे समुपदेश करण्यात आले. त्यानंतर त्यांनी आपसी सहमतीने आपल्या अपत्यांसाठी एकत्र होण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्या दांम्पत्याचा श्रीमती चाकणकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

तक्रारींमध्ये वैवाहिक, कौटुंबिक 71, सामाजिक 4, आर्थिक, मालमत्ताविषयक 2, कामाच्या ठिकाणी महिलांचा होणाऱ्या छळाविषयी 4, कामाच्या ठिकाणी छळ 1 तर इतर 13 अशा एकूण 95 तक्रारी सुनावणीसाठी प्राप्त झाल्या.

यावेळी आमदार सुलभा खोडके, राज्य महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, मनपा आयुक्त देविदास पवार, निवासी उपजिल्हाधिकारी रणजीत भोसले, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, महिला व बालविकास विभागीय उपायुक्त विलास मरसाळे, पोलीस उपायुक्त डॉ. सागर पाटील, विक्रम साळी, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जी.आर. पाटील, उपमुख्य कायकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी उमेश टेकाडे आदी यावेळी उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती