Tuesday, October 10, 2023

महाबॅक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थाव्दारे व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

 महाबॅक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थाव्दारे व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

 

          अमरावती, दि. 10: महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी), अमरावती यांच्या वतीने 30 दिवसाचे दोन चाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रशिक्षणार्थींना विविध योजना, वित्तपुरवठा व स्वयंरोजगाराविषयी मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

 

             टू व्हिलर दुरुस्ती प्रशिक्षण दि. 11 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरपर्यंत घेण्यात आले. प्रशिक्षण निशुल्क असून निवासी स्वरूपाचे होते. यामध्ये दुचाकीच्या विविध भागांची ओळख, सेवा, दुरूस्तीसाठी वापरावयाची साधने, वाहनांच्या सर्व्हिसिंग, दुरूस्तीसाठी वापरण्यात येणारी साधने इत्यादीचे मुलभूत व आधुनिक प्रशिक्षण थेअरी, डेमो आणि प्राक्टिकल प्रशिक्षण कृष्णा चव्हाण यांच्याकडून देण्यात आले. जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक संकेत पांडे यांनी प्रशिक्षणार्थींना स्वयरोजगाराचे प्रकार, जिल्हा उद्योग केंद्र राबवित असणाऱ्य योजना, प्रकल्प अहवाल व वित्तपुरवठाबाबत मार्गदर्शन केले. तसेच महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थाचे संचालक निखिल भस्मे यांनी प्रशिक्षणार्थींना स्वयंरोजगाराचे महत्त्व पटवून सांगितले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन दिपक माहुरे यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनाकरीता अनिता तरारे, धनंजय पांडे, शैलेश वानखडे व गजेंद्र बोबडे व यांचे सहकार्य लाभले.

00000

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...