Thursday, October 12, 2023

भरडधान्य खरेदी नोंदणीसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविले

 भरडधान्य खरेदी नोंदणीसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविले

अमरावती, दि. 11 : आधारभूत किंमत खरेदी योजनेत भरडधान्य ज्वारी व मका खरेदीसाठी शेतकरी बांधवांची नोंदणी करण्यासाठी दि. 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविले आहे. पात्र व इच्छूक शेतकऱ्यांनी विहित मुदतीत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी, अमरावती यांनी केले आहे.

आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत राज्य शासनामार्फत भरडधान्य ज्वारी व मका खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यात अचलपूर, मोर्शी, वरुड, धामणगाव रेल्वे या चार तालुक्यात खरेदी केंद्रे उघडण्यात आली आहेत.

शेतकरी नोंदणी करतांना या हंगामापासून ज्या शेतकऱ्यांचा 7/12 त्यामध्ये पिकपेऱ्याची नोंद असावी,आधार कार्ड, ॲक्टीव बँक खातेची अचूक माहिती या सर्व तपसिल दयावा, त्याशिवाय नोंदणी पूर्ण होत नाही.  त्या शेतकऱ्याने लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी स्वत: खरेदी केंद्रावर उपस्थित राहण्याबाबत जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...