वखार आपल्या दारी’ अभियानांतर्गत कार्यशाळा संपन्न

 वखार आपल्या दारी’ अभियानांतर्गत कार्यशाळा संपन्न

 
        अमरावती, दि. 23 (जिमाका): महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच ‘वखार  आपल्या दारी’ अभियानांतर्गत एक दिवशीय कार्यशाळा महराष्ट्र राज्य वखार महामंडळ, वरूड येथे आयोजित करण्यात आली होती. या माहितीपर कार्यशाळेचा शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था, महिला बचत गट व त्यांच्या फेडरेशनच्या सदस्यांनी लाभ घेतला. कार्यशाळेत वखार महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक अजित मासाळ, सहायक प्रोग्रामर रविकुमार बोडखे, पुणे राज्य व्यवस्थापक महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे प्रशांत चासकर, वरूड वखार महामंडळाचे केंद्रप्रमुख स्नेहा काळे, विभागीय व्यवस्थापक सहकार विकास महामंडळाचे दिपक बेदरकर, वरूड कृ. उ. बाजार समितीचे सभापती श्री. बावणे,  श्रीमती काने, यांनी मार्गदर्शन केले.
            महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या शेतकरी व शेतकरी उत्पादक संस्थांसाठी असलेल्या विविध योजना, सुलभ ऑनलाईन तारण ऋण इत्यादीबाबत  माहिती देण्यात आली.  या अभियानांतर्गत पुढील कार्यशाळा 25 ऑक्टोबर रोजी महराष्ट्र राज्य वखार महामंडळ वणी , जिल्हा यवतमाळ येथेही आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने राज्यभरात ‘वखार आपल्या दारी’ अभियानांतर्गत कार्यशाळा आयोजित करून शेतकऱ्यांपर्यंत महामंडळाच्या विविध योजना पाहेचविण्यात येत आहेत.
***

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती