Tuesday, October 17, 2023

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन; अमरावती जिल्ह्यातील 15 गावांची निवड

 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन; अमरावती जिल्ह्यातील 15 गावांची निवड


        अमरावती, दि. 17 (जिमाका): ग्रामीण भागातील तरुणांच्या रोजगार संधी आणि त्यांना स्वावलंबी करण्यासाठी राज्य शासनाने प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र सुरु करण्याचे अर्थसंकल्पात घोषणा केली होती. त्याअनुषंगाने  जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 15 गावांची निवड करण्यात आली आहे. या केंद्रांचे गुरुवार दि. 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजता ऑनलाईन पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येन उपस्थित राहावे, असे आवाहन  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.


राज्यातील 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केद्रांचे उद्घाटन होणार असून अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील कांडली, अमरावती येथील नांदगाव पेठ, अंजणगाव सूर्जी येथील कापूसतळणी, भातकूली येथील पूर्णा नगर, चांदूर रेल्वे येथील आमला विश्वेश्वर, चांदुरबाजार येथील  करजगाव, दर्यापूर येथील येवदा, धामणगाव रेल्वे येथील जुना धामनगाव, धारणी येथील दिया, मोर्शी येथील हिवरखेड, नांदगाव खंडेश्वर येथील लोणी, तिवसा येथील मोझरी, वरुड येथील जरुड व लोणी या केंद्रांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने  होणार आहे. तसेच चिखलदार तालुक्यातील टेंभू सोंडा या गावात ग्रामपंचायत पोट निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने येथील केंद्राचे उद्घाटन होणार नाही. 

0000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...