भ्रष्टाचारासंबंधी तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन

 

भ्रष्टाचारासंबंधी तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन

• दक्षता जनजागृती सप्ताह 5 नोव्हेंबरपर्यंत

 

          अमरावती, दि. 31 : राज्यात दरवर्षी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा दि. 31 ऑक्टोबर या जन्म दिवसानिमित्त एक आठवडा ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’चे करण्यात येते.  यंदाही दि. 30 ऑक्टोबर 2023 ते 5 नोव्हेंबर 2023 या कालावधीत ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहासाठी यावर्षी ‘भ्रष्टाचाराला नाही म्हणा; राष्ट्रासाठी वचनबध्द व्हा’  ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती कार्यालय येथे नुकतीच भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ घेवून दक्षता जनजागृती सप्ताह 2023 ची सुरूवात करण्यात आली. राज्यपाल रमेश बैस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सप्ताहानिमित्त दिलेला संदेश उपस्थितांना यावेळी वाचून दाखविण्यात आला.

           या कार्याक्रमास पोलीस अधिक्षक  मारूती जगताप, अपर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे, पोलीस उपअधीक्षक मिलिंदकुमार बहाकर  यांच्यासह सर्व अधिकारी, अंमलदार उपस्थित होते. दक्षता जनजागृती सप्ताह 2023 दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून भ्रष्टाचार निमुर्लन संबंधाने जनजागृतीपर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. याव्दारे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचार संबंधाने काहीही तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे संपर्क क्र. 0721-2553055/2664902 यावर टोल फ्री क्रमांक 1064 यावर संपर्क साधावा. अथवा कार्यालय पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्र, ललीत सेंटर, परांजपे कॉलनी, कॅम्प, अमरावती येथे प्रत्यक्ष येऊन भेटावे, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पोलीस उपअधीक्षक मिलींदकुमार बहाकर यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती