विद्याभारती महाविद्यालय येथे युवा मतदार नोंदणी व मतदार जनजागृती अभियान





 विद्याभारती महाविद्यालय येथे युवा मतदार

नोंदणी व मतदार जनजागृती अभियान

 

अमरावती, दि. 19 (जिमाका): मतदार नोंदणी अधिकारी, 038-अमरावती विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी, अमरावती यांच्या कार्यालयामार्फत विद्याभारती महाविद्यालय, अमरावती येथे आज युवा मतदार नोंदणी व मतदार जनजागृती अभियानांतर्गत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले.

 

            आगामी काळात होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने युवा मतदार नोंदणी करुन मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी भारत निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे. त्याचाच भाग म्हणून महाविद्यालयीन शिबिर राबवून त्यांच्यामार्फत नवमतदारांपर्यंत पोहोचून मतदार नोंदणीचे काम जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनात निवडणूक विभागाने सुरु केले आहे.

 

            विद्याभारती महाविद्यालय येथे युवा मतदार नोंदणी व मतदार जनजागृती अभियानांतर्गत विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, विद्याभारती महाविद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती प्रज्ञा येनकर, मतदार नोंदणी अधिकारी अनिल भटकर, सहायक मतदार नोंदणी अधिकारी विजय लोखंडे यावेळी उपस्थित होते.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. शिंदे यांनी लोकशाही, निवडणूका व मतदाराचे महत्त्व युवा विद्यार्थ्यांना यावेळी समजावून सांगितले. तसेच मतदार नोंदणीचे आवाहन केले. अंदाजे 150 विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणीसाठी फॉर्म नं. 6 ची यावेळी उचल केली.

 

कार्यक्रमाचे आभार विद्याभारती महाविद्यालयाचे एनएसएस विभागप्रमुख अमित इंगोले यांनी मानले. अभियानाच्या यशस्वीतेसाठी महसूल विभागाचे नायब तहसीलदार श्री. रासेकर, मंडळ अधिकारी ज्ञानेश्वर गावनेर, सत्यजित थोरात, भारत कांबळे आदींनी सहकार्य केले.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती