Posts

Showing posts from June, 2020

शिक्षण राज्यमंत्र्यांचा पुढाकाराने जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण

Image
                शिक्षणापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही -           शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू   अमरावती, दि. 30 : कोरोना संकटकाळामुळे शाळा सुरू होण्यात अडथळे निर्माण झाले तरीही विविध ऑनलाईन माध्यमांचा वापर करून ऑनलाईन शिक्षण देण्यात येईल. मोबाईल नसलेल्या विद्यार्थ्यांचीही व्यवस्था करण्याचे नियोजन केले जात आहे. शिक्षणापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही, असे प्रतिपादन शिक्षण, जलसंपदा व कामगार राज्यमंत्री बच्चभाऊ कडू यांनी येथे केले.   शिक्षण राज्यमंत्री श्री. कडू यांनी काल परतवाडा येथे शिक्षण विभागाच्या अधिका-यांची बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. आमदार राजकुमार पटेल, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, गट शिक्षणाधिकारी गंगाधर मोहने, देवीदास खुराडे यांच्यासह अनेक अधिकारी व शाळांचे केंद्रप्रमुख उपस्थित होते. राज्यमंत्री श्री. कडू म्हणाले की, कोरोना संकटकाळात आरोग्याची सुरक्षितता जपण्यासह विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन माध्यमांचा वापर करावा लागणार आहे. याचअंतर्गत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर अचलपू

माता रुक्मिणीची पालखी पंढरपूरला रवाना

Image
    पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते विधीवत पूजन एसटी बसद्वारे पालखीचे प्रस्थान   अमरावती, दि. 23 : गत सव्वाचारशे वर्षांची परंपरा असलेल्या कौंडण्यपुरातील रुक्मिणीमातेच्या पालखीचे आज एसटी बसद्वारे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते माता रूक्मिणीच्या पालखीचे विधीवत पूजन होऊन पालखी रवाना झाली. यावेळी ‘जयहरी विठ्ठल’च्या जयघोषात विदर्भाची पंढरी कौंडण्यपूरनगरी दुमदुमून गेली होती.              शतकानुशतकांची परंपरा असलेल्या व विविध शतकांतील संत-महात्म्यांच्या सहवासाने पुनित झालेली ही पालखी परंपरा कोरोना संकटकाळातही अखंडित राहिली. आज सकाळी दहाच्या सुमारास 20 वारकऱ्यांचा समावेश असलेली ही पालखी एसटी बसने आषाढी यात्रेसाठी पंढरपूरला   रवाना झाली.    जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज सकाळी रुक्मिणी मातेच्या पादुकांचे विधिवत पूजन करण्यात आले. मंदिरापासून    पालखी मार्गक्रमण करत गावाच्या वेशीपर्यंत आणण्यात आली व नंतर 20 वारक-यांसोबत पादुका पंढरपूरकडे रवाना करण्यात आली. विठ्ठल-रुक्मिणीनामाच

चाचण्यांची संख्या वाढविणार; स्थानिक प्रयोगशाळेच्या तपासणी क्षमतेत वाढ - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

Image
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना        अमरावती, दि. 29 : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांत चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील प्रयोगशाळेची तपासणी क्षमताही वाढविण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज दिली.   जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, कोविड- 19 संसर्ग प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना होत असतानाही काही बाबींमध्ये शिथीलीकरण आणण्यात आले आहे. आर्थिक, सामाजिक व्यवहारांना गती देण्यासाठी काही प्रमाणात शिथिलता आणणे आवश्यक होते. सध्या मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. स्थानिक प्रयोगशाळेतही तपासणी क्षमता वाढविण्यात येत आहे.    नागरिकांनीही या काळात सजग राहून व्यवहार करावेत व स्वच्छता, सोशल डिस्टन्स, मास्कवापर आदी सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. शाळा- महाविद्यालये सुरु करण्याबाबत निर्णय अद्याप झालेला नसला तरीही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जोपासण्यासाठी ई-लर्निंग, ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्यास शाळा व्यवस्थापनाला सूचना देण्यात आल्या आहेत, असेही ते म्हणाले. डॉ.

रस्ते विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Image
पायाभूत सुविधांच्या कामांना गती देणार   अमरावती, दि. 29 : कोरोना संकटामुळे आर्थिक प्रश्न उभे राहिले, तरीही त्यातून मार्ग काढत विकासाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. जिल्ह्यात आवश्यक पायाभूत सुविधांची कामे नियोजनानुसार पूर्ण केली जातील. त्यानुसार जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात वन विभागाच्या अखत्यारीत नसलेल्या क्षेत्रात कामे सुरु करण्यात आली आहेत. हायब्रीड ॲन्युईटीअंतर्गत कामे व इतर कामांसाठी निधीबाबत पाठपुरावा होत आहेत. रस्तेविकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली.   जिल्ह्यात हायब्रीड ॲन्युईटीअंतर्गत 265 किलोमीटर लांबीची कामे पूर्णत्वास गेली आहेत. कोरोना संकटकाळ, लॉकडाऊन आदींमुळे उर्वरित कामांमध्ये काहीसे अडथळे आले. मात्र, त्याही कामांना गती देण्यासाठी प्रयत्न होत आहेत. याबाबत पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी नुकतीच सार्वजनिक बांधकाम विभागाची बैठक घेऊन आवश्यक रस्ते, पूल व इमारतींची कामे प्राधान्यक्रम लक्षात घेऊन पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात वन विभागाच्या अखत्यारीत येत न

जिल्ह्यात पावणेबारा लाख वृक्षलागवडीचे नियोजन

Image
मनरेगाच्या माध्यमातून वृक्ष लागवडीच्या उपक्रमाला चालना वृक्षलागवड उपक्रम ही लोकचळवळ व्हावी                    -           पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर   अमरावती, दि. 28 : वन आणि विविध विभागांच्या सहाय्याने जिल्ह्यात यंदा 11 लाख झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मनरेगाच्या माध्यमातून वृक्ष लागवडीच्या उपक्रमाला चालना द्यावी. केवळ उपक्रम म्हणून मर्यादित न ठेवता वृक्षलागवड ही लोकचळवळ व्हावी. त्यामुळे या उपक्रमासाठी स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालये, विविध संस्था व संघटनांचा सहभाग मिळवावा, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.   कोरोना विषाणू प्रतिबंध उपाययोजना होत असताना विकासाला गती देण्यासाठी विविध योजनांना चालना देण्यात आली आहे. विशेषतः ग्रामीण भागात लॉकडाऊनच्या काळामध्ये रोजगारनिर्मितीला चालना देण्याच्या दृष्टीने मनरेगाच्या माध्यमातून शेकडो कामे हाती घेण्यात आली. रस्तेविकास, जलसंधारणासह अनेक कामांचा त्यात समावेश आहे. या कामांना सुरुवात झाल्यापासूनच अमरावती जिल्हा राज्यात सतत आघाडीवर राहिला आहे. या

दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतक-यांना कंपन्यांनी तातडीने नुकसानभरपाई द्यावी - जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

Image
  अमरावती, दि. २७ : सदोष बियाण्यामुळे दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतक-यांना संबंधित बीज उत्पादक कंपन्यांनी नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा या कंपन्यांवर कडक कारवाई करावी, असे सुस्पष्ट निर्देश जलसंपदा, कामगार, शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज चांदूर बाजार येथे दिले.                           राज्यमंत्री श्री. कडू यांनी कृषी अधिकारी व संबंधित कंपन्यांचे प्रतिनिधींची बैठक घेऊन सदोष बियाण्यामुळे उद्भवलेल्या स्थितीचा आढावा घेतला. उपविभागीय कृषी अधिकारी राहूल सातपुते, प्रफुल्ल सातव, तालुका कृषी अधिकारी अंकुश जोगदंड यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.    राज्यमंत्री श्री. कडू म्हणाले की, सदोष बियाण्यामुळे पीकाची उगवण न झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत.    कोरोना संकटामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांपुढे सदोष बियाण्यामुळे आणखी अडचण उभी राहिली आहे. त्यामुळे त्यांना नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे. बियाणे अधिनियमाअंतर्गत सदोष बियाणे आढळल्यास संबंधित कंपनीने शेतक-यांना नुकसानभरपाई दिली पाहिजे, अन्यथा कृषी विभागाने कंपन्यांविरुद्ध कडक कारवाई कराव

तालुका निहाय नियोजन करून उपक्रम यशस्वी करावा - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे निर्देश

Image
नवीन तंत्रज्ञान पोहोचणार शेतकऱ्यांच्या बांधावर   अमरावती, दि. 27 : शेतकरी बांधवांच्या बांधावर निविष्ठा पुरवठ्याच्या उपक्रमानंतर आता अद्ययावत कृषी तंत्रज्ञान शेतकरी बांधवांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम शासनाने आखला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त येत्या एक जुलैला जिल्ह्यात त्याचा शुभारंभ होणार आहे. यादृष्टीने प्रत्येक तालुक्यात उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिपूर्ण नियोजन करावे, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.        कृषि दिनानिमित्त येत्या एक जुलैपासून ‘कृषी संजीवनी सप्ताह’ साजरा करण्यात असून या काळात कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कृषि विद्यापीठ व कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक उत्पादनवाढीसाठी नवनवीन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करणार आहेत. पिकाची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ या त्रिसूत्रीचा अवलंब करत 1 ते 7 जुलै दरम्यान कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी तालुकानिहाय नियोज

पणन महासंघाच्या कर्जाला एक हजार कोटीची शासनहमी

Image
शेतकरी बांधवांच्या हित संरक्षणासाठी राज्य शासन कटिबद्ध जिल्ह्यात कापूस खरेदीला वेग द्यावा - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर   अमरावती, दि. 26: कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना कापसाचे पैसे वेळेत मिळावेत, यासाठी राज्य पणन महासंघाच्या कर्जाला एक हजार कोटी रूपयांची शासन हमी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शेतकरी बांधवांच्या हित संरक्षणासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातही कापूस खरेदीच्या प्रक्रियेला वेग द्यावा, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.    महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाद्वारे हंगाम 2019-20 मध्ये किमान आधारभूत दराने खरेदी करण्यात येणाऱ्या कापसाचे चुकारे शेतकऱ्यांना वेळेत अदा करण्यासाठी कापूस पणन महासंघास रुपये 1800 कोटींच्या कर्जास यापूर्वी दिलेल्या शासन हमी प्रमाणेच, अतिरिक्त रुपये 1000 कोटीच्या कर्जास शासन हमी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कालच्या मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. या रुपये 1000 कोटी शासनहमीवर कापूस पणन महासंघास राज्य शासनास अदा करावे लागणारे हमीशुल्क म

जिल्हाधिका-यांची अंजनगाव सुर्जीला भेट व शेतांची पाहणी

Image
सदोष बियाणे तक्रारींबाबत तत्काळ पंचनामे करावेत               - जिल्हाधिकारी शैलेश नवाल                          अमरावती, दि. 25 : काही कंपन्यांच्या बियाण्याची उगवण होत नसल्याच्या शेतकरी बांधवांच्या तक्रारींनुसार तत्काळ पंचनामे करून रविवारपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज अंजनगाव सुर्जी येथे दिले.                        जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी आज अंजनगाव सुर्जी शहर व तालुक्याचा दौरा केला. या पाहणीत त्यांनी अंजनगाव सुर्जी येथील कंटेनमेंट झोन, बफर झोनची पाहणी केली, तसेच तालुक्यातील काही गावांना भेटी देऊन शेतीची पाहणी केली. उपविभागीय अधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार विश्वनाथ घुगे यांच्यासह नगरपालिका व इतर विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.                        प्रारंभी जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी अंजनगाव सुर्जी येथील कंटेनमेंट झोन, बफर झोनची पाहणी करून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने शहरात सर्व प्रकारची दक्षता घेतली जावी. नगरपरिषद, महसूल विभाग, आरोग्य विभाग, पोलीस विभागांनी समन्वय ठेवून कार्यवाही करावी. कोरोना प्रतिबंधक दक

कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बँकांसोबत करारनामे

Image
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आधार प्रमाणीकरणाचे काम तत्काळ पूर्ण करावे                  - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर              अमरावती, दि. 25 : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतक-यांना तत्काळ नवे कर्ज मिळवून देण्यासाठी बँकांसोबत करारनामे करण्यात येत आहेत. त्यानुसार योजनेतील पात्र शेतक-यांचे थकित कर्ज शासनाच्या नावे होईल व शेतकरी बांधवांना नवे कर्ज मिळेल. या प्रक्रियेला गती देताना आधार प्रमाणीकरणाचे कामही तत्काळ पूर्ण करावे, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शासन शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. केवळ कर्जमाफी नव्हे, तर कर्जमुक्तीचे उद्दिष्ट आम्ही डोळ्यासमोर ठेवले आहे. त्यामुळे कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी    बँकांशी करारनामे करण्यात येत आहेत. त्यानुसार कॅनरा बँक, विदर्भ कोकण ग्रामीण विकास बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आदी बँकांशी करार झाला असून, उर्वरित राष्ट्रीयकृत, खासगी, व्यापारी व इतरही बँकांशी करार करण्यात येत आहेत. त्यामुळे योज