वझ्झर येथे सापन प्रकल्पावर पर्यटन क्षेत्र विकसित होणार - जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू





अमरावती, दि. 20 : अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील सापन नदी प्रकल्पावर पर्यटन क्षेत्र विकसित करण्यात येईल. त्यासाठी दोन कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी तत्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश जलसंपदा, शिक्षण, कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज दिले.

राज्यमंत्री श्री. कडू यांनी आज अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथे भेट देऊन नियोजित जागेची पाहणी केली. आमदार राजकुमार पटेल, जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्री. कडू म्हणाले की, प्रकल्पात हाऊसबोट, पर्यटक निवास, पदभ्रमण मार्ग, विविध पॉईंटस, पर्यटकांसाठी इतर सुविधांचा समावेश आहे. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळून स्थानिक आदिवासी बांधवांना रोजगार मिळणार आहे.  हे क्षेत्र अचलपूर तालुक्यातील नंदनवन ठरावे, असे निर्देश राज्यमंत्री श्री. कडू यांनी यावेळी दिले.

प्रकल्पात आवश्यक तो सर्व निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी नियोजनानुसार कामे पूर्ण करावीत. प्रत्येक काम दर्जेदार झाले पाहिजे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

यावेळी स्थानिक नागरिकही उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती